वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल, कमर्शिअल गॅसच्या दरवाढीचा महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे दर वाढले आहेत. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० रुपयांची दरवाढ झाल्याने आता सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे. The rise in domestic gas prices; In the house of 1000 cylinder increased by 50 rupees
दिल्लीत घरगुती गॅसचा दर ९९९ रुपये ५० पैसे इतका झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. २२ मार्चला यापूर्वी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते.
१ एप्रिलला कमर्शिअल एलपीजी सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात त्यामध्ये १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा फटका बसला आहे.
The rise in domestic gas prices; In the house of 1000 cylinder increased by 50 rupees
महत्वाच्या बातम्या
- Shivsena – NCP : स्थानिक निवडणुकाच अजून डळमळीत, पण चर्चा आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हेंच्या राजकीय भवितव्याची!
- राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी समज दिल्याचा मनसेचा दावा
- Raj Thackeray : कायदेशीर ससेमिरा!!; सांगली पाठोपाठ परळी कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट!!
- आत्महत्या करणारे 1000 शेतकरी, 135 एसटी कर्मचारी हे बहुजन नव्हते का??; पडळकरांचा राऊतांना सवाल!!
- ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, कोरोनाच्या लाटेनंतर सीएए लागू होणारच, अमित शाह यांनी ठणकावले
- काश्मीरचा वरचष्मा होणार कमी, विधानसभेत वाढल्या जम्मूमधील जागा