Tuesday, 13 May 2025
  • Download App
    चाणक्य वगैरे बात सोडा, आघाडी सरकार पडण्याचे "खरे क्रेडिट" उद्धव ठाकरेंनाच!!; फडणवीसांचा टोला The real credit for the fall of the Aadhya government goes to Uddhav Thackeray

    चाणक्य वगैरे बात सोडा, आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच!!; फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी

    मुंबई : चाणक्य वगैरे बाद सोडा पण महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच आहे. कारण त्यांनी जर भाजपशी युती तोडली नसती, पोकळ सरकार बनवले नसते, शिवसेनेच्या बळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बळ दिले नसते, तर त्यांचे सरकार पडलेच नसते. महाविकास आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरेंनाच आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याची आणि नवीन सरकार येण्याची अनेक “गुपिते” फोडली आहेत. The real credit for the fall of the Aadhya government goes to Uddhav Thackeray

    2019 मध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देखील ज्यावेळी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जाऊन सरकार बनवले आणि उद्धव ठाकरे त्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच हे निश्चित झाले होते की हे नैसर्गिक सरकार टिकणार नाही. फक्त त्याची वेळ आणि पद्धती निश्चित झालेली नव्हती. उद्धव ठाकरे यांनी राज्य करताना शिवसेनेकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यामुळे बळ मिळाले आणि याचीच अस्वस्थता शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती. त्याचा फायदा राजाकीय पक्ष म्हणून भाजपने उचलला, अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


    Devendra Fadanvis On Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी खोलला वाझे प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा, म्हणाले- वाझेंच्या राजकीय हँडलरचा शोध महत्त्वाचा!


    महाराष्ट्रातील सत्तांतरात आपला देखील थोडा वाटा होता. परंतु, केंद्रीय नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा होता. अमित शाह हे रणनीती ठरवण्यात होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा होता. ते अशी रणनीती ठरवण्यात असत नाहीत, असा खुलासा देखील फडणवीस यांनी केला आहे.

    मुलाखतकाराने महाराष्ट्रातील सत्तांतरामध्ये आपण चाणक्याची भूमिका बजावली का??, असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, की चाणक्य वगैरे बात सोडा. मला विचाराल तर महाविकास आघाडी सरकार पडण्याचे “खरे क्रेडिट” मी उद्धव ठाकरे यांनाच देईन. कारण त्यांनी युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर जाऊन आघाडीचे पोकळ सरकार बनवले नसते, मुख्यमंत्री पदावर राहून शिवसेनेकडे दुर्लक्ष करून काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ दिले नसते, तर शिवसेनेच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांचे सरकार पडले नसते. त्यामुळे सरकार जाण्याचे “खरे क्रेडिट” उद्धव ठाकरे यांनाच आहे, असा टोला फडणवीस यांनी मुलाखतीत लगावला आहे.

    The real credit for the fall of the Aadhya government goes to Uddhav Thackeray

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक