महायुती सरकारचे पाऊल, क्रांतीकारी पर्वाची चाहूल ; कदम मिलाकर चलना होगा, असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दादर येथे आयोजित महायुतीचा महामेळाव्यात शनिवारी उपस्थित राहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.The real battle of the Mahayuti will be with four parties in the upcoming assembly elections Devendra Fadnavis
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महायुतीची खरी लढाई येत्या विधानसभा निवडणुकीत केवळ मविआतील 3 पक्षांसोबत नसून ‘फेक नॅरेटिव्ह’ या चौथ्या पक्षासोबत आहे. राज्यातील एकही घटक विकासापासून वंचित राहू नये म्हणून महायुती सरकारकडून एकूण 24 योजनांच्या आधारे विकासाची गंगा पोहचवण्यात येत आहे. या योजनांची पुस्तिकाही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार आहोत.
तसेच, आशासेविका, अंगणवाडीसेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांचे मानधन वाढवले आहे. तसेच शहरांमध्येही होणारी विकासकामे जनतेपर्यंत पोहचवणे ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. ‘काम करणारे कोण आणि कोण बोलबच्चन भैरवी’ हे जनता येत्या काळात ठरवेल. असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार नारायण राणे जी, मंत्री मंगलप्रभात लोढा जी, मंत्री उदय सामंत, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
The real battle of the Mahayuti will be with four parties in the upcoming assembly elections Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Ravikant Tupkar : विकांत तुपकर विधानसभेला बुलढाण्यातील सर्व जागा लढवणार; बच्चू कडूंसह तिसऱ्या आघाडीची तयारी
- लक्ष्मण हाके म्हणाले- पवारांकडून माझे तिकीट फायनल होते पण नंतर काय झाले हे त्यांनाच ठाऊक
- विधानसभेसाठी महायुतीची तयारी; फडणवीसांनी प्रवक्त्यांचे टोचले कान, 200 जागा जिंकण्याचे गणितही सांगितले
- हातरस घटनेतील आरोपी देव प्रकाश मधुकर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी