अखेर लढाईला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष आहे, तेथेच म्हणजे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात या दोन पक्षांमध्ये लढाईला उघड तोंड फुटले आहे. आधी राष्ट्रवादीने मावळची जागा मागून शिवसेनेची खोडी काढली. त्यापाठोपाठ शिरूर मध्ये संजय राऊत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पुढील खासदार म्हणून उल्लेख करून राष्ट्रवादीचा वचपा काढला. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्षाचा राजकीय नाट्याचा पुढचा अंक अजित पवारांनी सुरू केला आहे. शिरूर मध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीशी अजितदादा ठामपणे उभे राहिले आहेत. The real battle is between Shiv Sena and NCP
– अजितदादांचा संजय राऊतांना इशारा
शिवसेनेत उमेदवारांना तिकीट देण्याचे अधिकार संजय राऊतांना आहेत की, उद्धव ठाकरे यांना?, असा सवाल त्यांनी केला आहे.
शिरूरचे पुढचे खासदार पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील असतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. पण यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांच्या कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून संजय राऊत तसं म्हणाले असतील. उद्या मी पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून जिथे शिवसेनेचा खासदार आहे तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन. पण उमेदवार मी जाहीर केला तरी त्याला तिकीट देण्याचा अधिकार मला आहे की शरद पवारांना? तसाच शिवसेनेत संजय राऊतांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना?, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
अजित पवारांनी जर तरची भाषा वापरली असेल तरी खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातली खदखद बाहेर आली आहे. कारण शरद पवारांच्या मानला गेलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती वगळता एकही खासदार राष्ट्रवादीचा नाही. मावळ मध्ये शिवसेनेचे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार आहेत. आणि आधी 3 टर्म शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हो खासदार होते. सध्या डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा आपल्या आपले वर्चस्व पुणे जिल्ह्यावर प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मावळची शिवसेनेची जागा राष्ट्रवादी पार्थ पवार यांच्यासाठी मोकळी करायचे मागणी केली आहे. मात्र, त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
पण आता संजय राऊत यांनी शिवाजीराव आढळराव यांच्या बाजूने वक्तव्य केल्यानंतर मात्र अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत डॉ. अमोल कोल्हे यांची बाजू उचलून धरली आहे यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीतला खरा संघर्ष बाहेर आला आहे.
The real battle is between Shiv Sena and NCP
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले कौतुक
- राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर हा पुनर्विचाराचा आधार ठरत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड