प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले होते. पण उपोषण सुरू झाल्यावर काही लोकांनी त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही लोक रात्री अडीच वाजता तिथे पोहोचले. पण आंदोलकांनी घोषणाबाजी करून त्यांना बरोबर प्रत्युत्तर दिले, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर केली. The protestors responded with slogans to those who made political noises on Maratha reservation
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणा संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. त्याला छत्रपती उदयनराजे भोसले संभाजी राजे हे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले :
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. आम्हांला कोणाला फसवायचं नाही. आमची भूमिका देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही होती आणि आजही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह त्यांच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारचं युध्दपातळीवर काम सुरु आहे. तसेच ज्या काही त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणात काढल्या आहेत, त्यावर काम सुरु आहे. आरक्षणात सरकार कधीच मागे पडणार नाही.
पण मूळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. ते हायकोर्टात देखील टिकले, पण महाविकास आघाडीचे सरकार सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकवू शकले नाही. पण उपोषणाच्या ठिकाणी शरद पवार, रोहित पवार पोहोचले. रोहित पवार तर रात्री अडीच वाजता पोहोचले. हावराजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार होता. शरद पवार तर चार वेळा मुख्यमंत्री होते, पण आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना बरोबर प्रत्युत्तर दिले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनेच महायुतीचे सरकार आहे. पण आरक्षणाचा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या निकाली काढण्यासाठी काही अवधी लागणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसह मराठा समाजाला दिला. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या आडून काही लोकं आपली पोळी भाजून घेत समाजात शांतता बिघडवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विरोधकांवर केला आहे.
जालन्यात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. याविरोधात प्रचंड संतापाचा लाट पसरली आहे. अशातच राज्य सरकारकडून सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही मराठा आरक्षणाबाबत त्रुटी काढल्या आहेत. त्यावर आम्ही काम करतोय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे बाजूनेच सरकार आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवावा. आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे.
त्याचवेळी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे काही सवलती दिल्या जात आहेत, त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात एक उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. जालना येथील आंदोलन, उपोषण, लाठीहल्ला हा दुर्देवी प्रकार, तसेच मनोज जरांगेशी देखील मी स्वत: बोललो होतो. उपोषण आणि आपले जे काही आंदोलन, मागण्यांवर मी काम करतोय, मंत्री, गिरीश महाजन, अतुल सावे, संदिपान भुमरे, य़ांना मी पाठवलं. याआधीही मराठा समाजाचे आंदोलने झाली ती आपण पाहिली. लाखा लाखांचे मराठा समाजाचे ५८ मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, पण अतिशय शिस्तप्रिय पध्दतीने निघाले. कधीही त्याला गालबोट लागले नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली.
परंतू, दुर्देवाने दोन तीन दिवसांपासून जे काही सुरू आहे. मी कालही माझ्या भाषणात सांगितले, मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे. याचा अनुभव काही वर्षांत आला. पण आंदोलनाच्या आडून काही लोकं शांतता बिघडवण्याचे काम, जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असून त्यांच्यापासून सावध राहण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली पाहिजे.
शासन संवेदनशील….
खासदार उदयनराजे, संभाजीराजेही त्या ठिकाणी गेले त्यांनी तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. उदयनराजेंना मी मनापासून धन्यवाद देतो, ते स्वत : त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. काही लोकं त्या ठिकाणी गेले, त्यांनी सोबत असल्याचे सांगितले. पण मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी सरकारला नक्कीच आहे. तब्येत खालावल्यानंतर तिथे अधिकारी गेले, त्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जो काही लाठीचार्जचा प्रकार घडला त्याची आम्हांला खंत आहे. शासन आपलं संवेदनशील आहे.
दोषींवर कडक कारवाई
मी आजही जरांगेशी बोललो. त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हांला आहे. त्यांच्या मागण्यांवर आम्ही गांभीर्याने काम करत आहोत. त्यावेळेस सरकार जर गंभीर नसतं. तर फडणवीस मुख्यमंत्री असताना दिवस रात्र काम करून मराठा समाजाला आरक्षण दिलं नसतं. तसेच तिथे जो लाठीचार्जचा प्रकार घडला, त्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यात एसपीची जिल्ह्याबाहेर बदली केली असून उपविभागीय अधिकारी निलंबित केले. आता अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना चौकशी करतील. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
The protestors responded with slogans to those who made political noises on Maratha reservation
महत्वाच्या बातम्या
- भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री
- PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार
- मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!