त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोचार्ला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.The police should be vigilant so that law and order does not arise, Home Minister Dilip Walse-Patil orders Director General of Police
विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोचार्ला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन करताना वळसे-पाटील म्हणाले, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे.
पोलीसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना वळसे-पाटील यांनी दिल्या आहेत.
The police should be vigilant so that law and order does not arise, Home Minister Dilip Walse-Patil orders Director General of Police
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!