• Download App
    मूळ शिवसेना आमचीच, धनुष्यबाणही आमचेच; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद The original Shiv Sena is ours, dhanushyabab is also ours

    मूळ शिवसेना आमचीच, धनुष्यबाणही आमचेच; शिंदे गटाचा निवडणूक आयोगात लेखी युक्तिवाद

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले. सध्या खरी शिवसेना कुणाची?, पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरून उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सत्तासंघर्ष सुरू आहे. The original Shiv Sena is ours, dhanushyabab is also ours

    यासाठी लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दिले होते. यानुसार ठाकरे गटाने २१ जून २०२२ पासूनचा घटनाक्रम सादर करत पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करणे कसे चुकीचे आहे हे आपल्या युक्तिवादात म्हटले आहे तर शिंदे गटाने सादर केलेल्या लेखी उत्तरात अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत.

     मूळ पक्ष आमचाच आहे : शिंदे गट

    शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. यात मूळ शिवसेना पक्ष आम्हीच आहोत, असा दावा करण्यात आला असून एकनाथ शिंदे यांची निवड हे लोकशाही पद्धतीने झाले आहे. त्यामुळे त्यांचे पद हे घटनात्मक आहे असे म्हटले आहे. त्याचबरोबर धनुष्यबाण चिन्हावर पण शिंदे गटाने लेखी दावा केला आहे.



    एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार – खासदारांचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमत आणि संख्याबळ विचारात घ्यावे, असे या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. तसेच धनुष्यबाण चिन्हासाठी आम्ही पुराव्याची पूर्तता केली असून मूळ पक्ष आमचाच आहे, आम्हाला पक्षाचे चिन्ह मिळावे असे शिंदे गटाने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.

    The original Shiv Sena is ours, dhanushyabab is also ours

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ST employees strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; प्रवाशांना होणार त्रास?

    Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी; मागच्या दाराने पवारांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी!!