विशेष प्रतिनिधी
मुंबई् : काकांच्या मांडीवर बसल्यामुळे उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचे तांडव संजय राऊतांना दिसत नाही, अशा कठोर शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेतृत्वाला फटकारले आहे. The orgies of Aurangzeb’s descendants are not visible; The tiger becomes a rabbit to retain power; Padalkar’s attack
आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही नवा नाही. हा वाद आता पुन्हा एकदा पेटला असून, पडळकरांनी राऊतांवर थेट निशाणा साधला आहे. आपल्या आक्रमक शैलीत टीका करताना नेहमीप्रमाणेच पडळकरांनी राऊतांचा उल्लेख “जनाब” असा केला आहे.
आपल्या लेखातून भाजपाला हिंदुत्वाचे धडे देणारे राऊत उस्मानाबादेत झालेल्या भगव्याच्या अपमानाबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का, असा झणझणीत सवाल पडळकरांनी संजय राऊत आणि शिवसेनेला केला आहे.
ऐन हिंदू सणाच्या दिवशी हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरुन उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. त्यावेळेसे उस्मानाबादचे धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?, असा खोचक सवाल पडळकरांनी केला आहे. महाराष्ट्रातील तुमची लाचारी लपवण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. पण काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचे तांडव राऊतांना दिसत नाही. तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट-सुलट वक्तव्ये करतात, त्यावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? असे म्हणत पडळकरांनी उस्मानाबाद येथील घटनेवरुन संजय राऊत यांचे कानपिचक्या दिल्या आहेत.
विजय चौकात झेंडा लावण्यावरुन, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने उस्मानाबादमध्ये वाद निर्माण झाला होता. सोशल मिडीयावर औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहल्यामुळे, उस्मानाबादेत दंगे झाले. यामध्ये अनेक पोलिस देखील जखमी झाले. तरीही, या प्रकरणात राऊत यांनी कोणतेच भाष्य केले नाही, म्हणून पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले आहेत.
The orgies of Aurangzeb’s descendants are not visible; The tiger becomes a rabbit to retain power; Padalkar’s attack
महत्त्वाच्या बातम्या
- सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला राजस्थानात देशसेवा बजावताना वीरमरण , संभूखेडमध्ये होणार अंत्यसंस्कार
- NO BINDI NO BUSINESS : “नो बिंदी नो बिजनेस”! सोशल मीडियावर धुमाकूळ…शेफाली वैद्यंनी ठणकावले-अनेकांनी उठवला आवाज…वाचा सविस्तर
- सीरियामध्ये अमेरिकेचा पुन्हा हवाई हल्ला, अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद ड्रोन हल्ल्यात ठार
- सारा अली खानने गृहमंत्री अमित शहा यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , सारा झाली ट्रोल , जाणून घ्या कारण
- पंतप्रधान मोदी आज गोव्यात आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांशी करणार चर्चा