गेल्या अनेक दिवसांपासून इंपेरिकल डेटावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद चालू आहे.The OBC community again took up arms against the agitation; Chakkajam agitation on December 17
विशेष प्रतिनिधी
बीड : सर्वोच्च न्यायालायाने राज्यशासनाच्या ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाला स्थगिती दिल्यानंतर ओबीसी समाज प्रचंड तापला आहे.ओबीसी समाज आपल्या विविध मागण्यासांठी १७ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार आहे. अशी घोषणा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून इंपेरिकल डेटावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद चालू आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा सुप्रिम कोर्टाला द्यावा, त्याबरोबरच मंत्री मंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्थगित करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी हे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे.
पुढं सानप म्हणाले की , “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या स्थगितीनंतर महाराष्ट्रात ओबीसींना डावलून नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. हे दुर्दैव आहे. ५०० जणांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे. आम्ही असं होऊ देणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.