• Download App
    शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे "ठरवून" जाहीर; पण मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर माध्यमांकडून!! The names of ministers in the Shinde-Fadnavis cabinet have been "decided" and announced

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे “ठरवून” जाहीर; पण मुख्यमंत्र्यांकडून नव्हे, तर माध्यमांकडून!!

    विनायक ढेरे

    नाशिक : ज्या माध्यमांना देवेंद्र फडणवीस नव्हे, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे अखेर पर्यंत समजले नव्हते, त्या माध्यमांनी आता शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे परस्पर ठरवून जाहीर केली आहेत!!The names of ministers in the Shinde-Fadnavis cabinet have been “decided” and announced

    कुणाचे कुणाला फोन गेले??, कुणी कुणाला बोलवले??, कुणी कुणाला हजर राहायला सांगितले??, कोण कोणाला आज रात्री स्नेहभोजन देते आहे भ??, वगैरे तपशील माध्यमांनी आपल्या बातम्यांमध्ये दिले आहेत.

    शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदे गटाकडून जुन्या म्हणजे ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाच संधी मिळणार आहे, तर भाजप मात्र गुजरात पॅटर्न राबवून फडणवीस मंत्रिमंडळातल्या आधीच्या मंत्र्यांना वगळून थेट नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, अशा बातम्या काही माध्यमांनी दिले आहेत, तर त्याला काउंटर चेक म्हणून चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे काही माध्यमांनी “ठामपणे” पण सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे. त्याचबरोबर एक व्यक्ती एक पद न्याय लावत माध्यमांनी जर चंद्रकांत दादा पाटील हे मंत्री होणार असतील तर आशिष शेलार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील, असे “ठरवून” टाकले आहे!!



    त्याच बरोबर भाजपाकडून विजयकुमार गावित यांना बऱ्याच वर्षांनी संधी, तर थेट ठाकरेंना अंगावर घेणाऱ्या नितेश राणेंना मंत्रिपदाची लॉटरी अशाही “ठाम बातम्या” सूत्रांच्या हवालाने दिल्या आहेत.

    नेमकी सूत्रे कोणती??

    अर्थात, ही सूत्रे नेमकी कोणती दिल्लीतली की मुंबईतली याचा स्पष्ट उल्लेख एकाही बातमीत केलेला नाही. त्यामुळे उद्या 11.00 वाजता राजभवनात नेमके कोण मंत्री पदाची शपथ घेणार??, कोणाला कोणती मंत्रिपदे मिळणार??, हे अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहण्याची शक्यता आहे.

    शिंदेंच्या बंडावेळी सूत्रे कुचकामी!!

    एकनाथ शिंदे हे मुंबईतून सुरतला गेले. सुरतमधून गुवाहाटीला गेले. गुवाहाटीतून गोव्यात आले. गोव्यातून मुंबईत आले. या सगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी प्रत्यक्ष घटना घडल्यावर दिल्या होत्या. यापैकी कोणालाही एकनाथ शिंदे यांच्या बंडाची भनकही लागली नव्हती. इतकेच नाही, तर देवेंद्र फडणवीस उघडपणे जाहीर करेपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील हे कुणीही माध्यमांनी उघडपणे खात्रीशीर सांगितले नव्हते. तेव्हा बहुतांश “सूत्रे” कुचकामी ठरली होती!! आता उद्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी जी नावे मंत्री म्हणून प्रसिद्ध केली आहेत, ती कितपत खरी आहे हे उद्याच सकाळी 11.00 वाजल्यानंतर ठरण्याची शक्यता आहे!!

    The names of ministers in the Shinde-Fadnavis cabinet have been “decided” and announced

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ