वृत्तसंस्था
नागपूर : नागपूर ते मुंबई साडेतीन तासांत प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. हा प्रवास बुलेट ट्रेनच्या माध्यमातून करता येणार आहे. केंद्र सरकारने तसा प्रस्ताव दिला आहे. ताशी ३५० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. The Mumbai-Nagpur Samrudhi Expressway will run along the route
केंद्र सरकार विविध रेल्वे मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्याची योजना आखात आहे. भारतीय रेल्वेने आता महाराष्ट्रात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही शहरांमधील ७६६ किमीचे अंतर बुलेट ट्रेनने ३.५ तासांत कापले जाऊ शकते. समृद्धी द्रुतगती मार्गाच्या बाजूने ते बांधण्याचे प्रस्तावित आहे.
वेग ३५० किमी प्रति तास
नागपूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असेल, असे मानले जात आहे. सध्या ७६६ किमीचे हे अंतर १२ तासांत कापले जाते. प्रस्तावित मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) या महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात तयार होईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
The Mumbai-Nagpur Samrudhi Expressway will run along the route
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षयकुमार गँगस्टरच्या भूमिकेत; बच्चन पांडे चित्रपटात भयानक लूकमध्ये दिसणार प्रेक्षकांना
- Panipat : भले तालिबान्यांनी सैन्य तुकडीचे नाव “पानिपत” ठेवले असेल; आता पुढचे काम भारतीय सैन्याचे…!!
- OMG : DAILY WAGE LABOUR BECOMES SUPER MODEL-फर्श से अर्श …याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..
- औरंगाबादच्या गुलमंडी बाजारपेठेत हुरडा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
- काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के