वृत्तसंस्था
मुंबई : अवकाशात मंगळवारी (ता. 27) मोठा चंद्र पाहण्याची संधी आहे. उद्या चैत्र पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने तो पूर्वीपेक्षा मोठा दिसणार आहे. त्यामुळे खगोलीय अविष्काराचा आनंद खगोलप्रेमी आणि नागरिकांना लुटता येईल. The moon of Chaitra Pournima is bigger
चैत्र पौर्णिमा 27 तारखेला असली तरी 26 ते 28 असे 3 दिवस चंद्र पूर्ण पाहता येईल. तो नेहमीपेक्षा 10 टक्के मोठा व 30 टक्के तेजस्वी दिसणार आहे.
चंद्र व पृथ्वीमधील अंतर 3 लाख 58 हजार 615 किमी असेल. प्रत्येक वर्षी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर कमी, अधिक होत असते. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हे कमीतकमी अंतर 3 लाख 56 हजार 500 किमी तर दूरचे अंतर 4 लाख 6 हजार 700 किमी असते. यंदा हे सर्वात कमी अंतर 26 मे 2021 रोजी असेल. 26 जानेवारी 1848 रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ होता. नोव्हेंबर 2016 ला ताे पृथ्वीच्या खूप जवळ आला. 27 एप्रिल आणि 26 मे रोजीचे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर कमी असल्याने तो मोठा आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.
महत्वाची टीप : आकाश ढगाळ आणि पावसाळी वातावरण असेल तर मात्र पदरी निराशा पडू शकते.
The moon of Chaitra Pournima is bigger