विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज व संत समर्थ रामदास यांच्याबाबत उडालेल्या गदारोळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतल्यानंतर तब्बल बत्तीस वर्षापूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे!The memorial of Pawar and Samarth Ramdas and Chhatrapati Shivaji
हा फोटो आहे चाफळ (जिल्हा सातारा) येथील स्मारकाचा आहे. हे स्मारक छत्रपती शिवराय व संत समर्थ रामदासांचे आहे. या छायाचित्रात संत रामदासांसमोर छत्रपती शिवराय अतिशय विनम्रपणे बसले असल्याचे दाखविले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्या स्मारकाचे उद्घाटन दस्तुरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी २६ एप्रिल १९९० रोजी केली होते!
“संत रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते. कारण त्या दोघांचा कालखंड पूर्णपणे वेगळा आहे. काही लोकांनी असा चुकीचा इतिहास लिहिला,” असे वक्तव्य असणारी शरद पवारांची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. ही व्हिडीओ क्लिप जुनी आहे. त्याचाच आधार घेऊन आज सुप्रिया सुळे यांनीसुद्धा तसेच लिहिले आहे. सोबत त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या एका निकालाचा संदर्भही दिला आहे.
“जर समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरु नाहीत, असे पवार यांचे म्हणणे आहे तर त्यांनी स्वतः त्या स्मारकाचे उद्घाटन कसे केले?”, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.