आपल्या राहणीमानानुसार स्मार्ट असलेले स्मार्ट सिटी चे महापौर हे प्रत्येक गोष्टीत स्मार्टच असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.The mayor of Smart City is smart in everything; Pune’s mayor became the top among 1 lakh followers on Twitter
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सध्या अनेक बाबतीत लोकप्रिय ठरताना दिसत आहेत.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.आपल्या राहणीमानानुसार स्मार्ट असलेले स्मार्ट सिटी चे महापौर हे प्रत्येक गोष्टीत स्मार्टच असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे मोहोळ आता ट्विटर वर 1 लाख फॉलोअर्स असणाऱ्या महापौर मध्ये अव्वल ठरले आहेत. मोहोळ यांची सतत लोकांचे प्रश्न सोडवणे, जागरूक , दक्ष राहणे यामध्ये नागरिकांच्या मनात वेगळी छाप आहे.
माहिती सहस्रजिथ क्रिएशन्सच्या सायली नलवडे यांनी सांगितले की , महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा क्रमांक आहे. मात्र पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले आहे.
महापौर मोहोळ काय म्हणाले
महापौर मोहोळ म्हणाले की ,”आपल्या ट्विटर हँडलने आज १ लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. ट्विटरचा परिवार केवळ पुणे शहरातच नाही तर देश आणि विदेशातही पसरला, हे सुखावणारं आहे. आपला माझ्याबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळे हा टप्पा आपण ओलांडू शकलो. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !”
The mayor of Smart City is smart in everything; Pune’s mayor became the top among 1 lakh followers on Twitter
महत्त्वाच्या बातम्या