प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीत थोरला भाऊ – धाकटा भाऊ असा कलगीतुरा रंगला असताना महाविकास आघाडी टिकणारच, अशा शब्दांमध्ये अजितदादा पवारांनी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी दाखवली आहे. The Mahavikas Alliance will last; Ajitdada wrote on stamp paper ready
महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच थोरला भाऊ झाला आहे, असे वक्तव्य करून अजितदादांनीच महाविकास आघाडीतल्या राजकीय वादाला फोडणी दिली होती. त्यानंतर संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. संजय राऊत तर शिवसेनेने जिंकलेल्या मूळ 19 जागा महाराष्ट्रात सोडायला तयार नाहीत, नाना पाटोले यांनी काँग्रेसचा मेरिट फॉर्म्युला पुढे आणला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नानांना त्या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे.
त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लावला तर राष्ट्रवादी काँग्रेस टक्केवारी मध्ये थोरला किंवा धाकटा भाऊ तर नव्हेच तिसऱ्या नंबरचा भाऊ ठरला आहे. कारण राष्ट्रवादीला त्या निवडणुकीत 15.66 % मते मिळाली होती. जी चौथ्या क्रमांकावर होती.
या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी टिकेल का असा प्रश्न अजितदादांना विचारल्यानंतर अजितदादा म्हणाले, स्टॅम्प आणा. मी लिहून देतो, महाविकास आघाडी 100 % एकत्र राहणार!! आता स्वतः अजितदादांनीच स्टॅम्प पेपर वर लिहून देण्याची तयारी दाखवल्यानंतर महाविकास आघाडीत नेमक्या कशा प्रतिक्रिया उमटणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
The Mahavikas Alliance will last; Ajitdada wrote on stamp paper ready
महत्वाच्या बातम्या