दरम्यान या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.The lender sold the house to each other; Unable to bear the trauma, a young man committed suicide by hanging himself
विशेष प्रतिनिधी
पंढरपुर : पंढरपुरातील एका तरूणाने गावातील खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर परस्पर विक्री केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.संतोष प्रकाश साळुंखे असं आत्महत्या केलेल्या या तरूणाचे नाव आहे.या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली
संतोष साळुंखे या तरुणाने पंढरपूर येथील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर व अंकुश रामा बिडकर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.दरम्यान थोड्या कालावधीतच संतोषने त्या सावकारांचे पैसे व्याजासह परत केले होते. तरीसुद्धा वरील तिघांनी संतोषला व्याजाची जास्त रक्कम दे म्हणून मारहाण केली.
मारहाण करून सुद्धा व्याजाच्या पैशात लिहून घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली.या घटनेमुळे संतोष खूप तणावाखाली होता.दरम्यान त्याने याच मानसिक धक्क्यातून संतोष याने टोकाचे पाऊल उचलले.याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
The lender sold the house to each other; Unable to bear the trauma, a young man committed suicide by hanging himself
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking News : MHADA Exam-म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या कधी होणार परीक्षा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंजाब सरकारच्या बचावात शेतकरी नेते टिकैत, फुल आखाड्यात!!
- BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय
- PM SECURITY : पंजाब-मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल; उद्या सुनावणी