प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चात एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा नॅनो झाल्याची टीका केली आहे. The language of burning Maharashtra in Pawar’s mouth
महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावर आणि सीमा प्रश्नावर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर घटक यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात प्रामुख्याने शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करून घेतले. मोर्चाच्या अखेरीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख भाषणे झाली. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हटविल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही आणि केंद्र सरकारने राज्यपालाविरुद्ध कारवाई केली तर केली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.
फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चा मध्ये झालेल्या टीकेला उत्तर देताना तीन पक्षांनी एकत्र येऊन केलेला हा महामोर्चा मुळातच नॅनो म्हणजे खूप छोटा झाल्याची टीका केली. खरं म्हणजे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर प्रचंड मोर्चा निघायला हवा होता. पण हा महामोर्चा गर्दी जमवण्याच्या दृष्टीने विफल ठरला. त्यामुळे मराठी प्रसार माध्यमांनी देखील महामोर्चातले क्लोज अप शॉट दाखवले. कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत. कारण ड्रोन शॉट दाखवले असते तर महामोर्चा फसल्याचे दिसले असते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे खिल्ली उडवली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आदर्श होते आणि यापुढेही राहतील. राज्यपालांसंदर्भात जो काही निर्णय करायचा आहे, तो केंद्र सरकार करेल, असा निर्वाळा फडणवीस यांनी दिला.
पण त्याच वेळी फडणवीसांनी सीमा प्रश्न मूळातच तयार करणारी काँग्रेस आहे आणि आज तेच त्या विषयावर मोर्चा काढत आहेत या विसंगतीवर बोट ठेवले. परंतु फडणवीस यांचा प्रामुख्याने भर मोर्चा गर्दी जमवण्यात अपयशी ठरण्यावर होता. त्यांनी माध्यमांच्या रिपोर्टिंग वर देखील बोट ठेवले. माध्यमे एरवी विविध मोर्च्यांचे ड्रोन शॉट दाखवतात. पण महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे मात्र माध्यमांनी क्लोज अप शॉट दाखवले. ड्रोन शॉट दाखवलेच नाहीत त्यामुळे हा मोठा मोर्चा दिसला परंतु ड्रोन शॉट दाखवले असते तर मोर्चाचे वास्तव उघडे पडले असते, असा टोला त्यांनी महाविकास आघाडी आणि माध्यमांनाही लावला.
महाविकास आघाडीला सरकारने हा महामोर्चा आझाद मैदानात आणण्याची सूचना केली होती परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ते धाडसच दाखवले नाही कारण तेवढी गर्दीच ते महामोर्चात जमवू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी छोट्या रस्त्यांवरून मोर्चा काढला. जिथे छोटी गर्दी ही मोठी दिसेल असा रस्ता पकडून तिथे सभा घेऊन भाषणे केली, असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
The language of burning Maharashtra in Pawar’s mouth
महत्वाच्या बातम्या
- महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!
- महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी
- भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण; सावरकर टीआरपीच्या सावटाखाली धुगधुगती लिबरल आशा
- JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा