• Download App
    The Kashmir Files : महिनाभरानंतर “द काश्मीर फाईल्स” सिनेमा झी- 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित । The Kashmir Files will on zee 5 ott app soon

    The Kashmir Files : महिनाभरानंतर “द काश्मीर फाईल्स” सिनेमा झी- 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काश्मीरमधील हिंदुंचे भयानक शिरकाण दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स 1 मार्च रोजी हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्रू अनावर झाले. चित्रपटाने रिलीजनंतर तीन दिवसांमध्ये 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. पण त्याच वेळी काही ठिकाणी या सिनेमाविरोधात फिल्म जिहाद सुरू झाला आहे. अनेक लोक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. The Kashmir Files will on zee 5 ott app soon

    द कश्मीर फाइल्स हा चित्रपट झी- 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. जवळपास एक महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अक्षय कुमार, कंगना रनौत, परिणीती चोप्रा, आर माधवन आणि परेश रावल अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

    वा आणि भिवंडीत “फिल्म जिहाद”

    काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी गोवा आणि भिवंडीत “फिल्म जिहाद” पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. थिएटरमध्ये जागा शिल्लक असताना हाऊसफुल्लचे खोटे बोर्ड लावणे तसेच धर्मांध मुस्लिमांनी बल्कने तिकिटे खरेदी करून चित्रपट पाहण्यापासून हिंदूंना रोखणे असले प्रकार पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात “द काश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीला जनतेचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.



    सेक्युलर पोटदुखी

    ‘द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे. परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणीवपूर्वक आवाज बंद करणे, प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी.

    शिवसेनेची भूमिका काय?

    बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, असे प्रवीण दटके म्हणाले आहेत. अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला “द काश्मीर फाइल्स” हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.

    The Kashmir Files will on zee 5 ott app soon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!