• Download App
    The Kashmir Files : बॉलिवूडच्या मनी लॉन्ड्रिंगकडे दुर्लक्ष; विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांसाठी कमाई दान करण्याचा नियाज खान, जयंत पाटलांचा "शहाजोग सल्ला"!!| The Kashmir Files: Ignoring Bollywood's Money Laundering; Niyaz Khan, Jayant Patil's "Shahjog advice" to donate money to Vivek Agnihotri for Kashmiri Pandits !

    The Kashmir Files : बॉलिवूडच्या मनी लॉन्ड्रिंगकडे दुर्लक्ष; विवेक अग्निहोत्रींना काश्मिरी पंडितांसाठी कमाई दान करण्याचा नियाज खान, जयंत पाटलांचा “शहाजोग सल्ला”!!

    नाशिक : आत्तापर्यंत बॉलिवूड मध्ये हजारो कोटींची सिनेमाची कमाई झाली आहे. बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा हजारो कोटींचा पैसा गुंतवला गेला आहे. मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ज्या “द काश्मीर फाईल्स” सिनेमाने 200 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे, त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना मात्र काश्मिरी हिंदूंसाठी सिनेमाची कमाई दान करण्याचा शहाजोग सल्ला द्यायला मात्र अनेक जण पुढे आले आहेत. यामध्ये “ऐरे गैरे नथ्थू खैरे” लोक तर आहेतच पण शहाजोग सल्ला घरांमध्ये आयएएस ऑफिसर्स, मंत्री यांचा देखील समावेश आहे.
    The Kashmir Files: Ignoring Bollywood’s Money Laundering; Niyaz Khan, Jayant Patil’s “Shahjog advice” to donate money to Vivek Agnihotri for Kashmiri Pandits !

    मध्यप्रदेश मधले आयएएस ऑफिसर आणि आश्रम या वादग्रस्त वेब सीरिजच्या मूळ कादंबरीचे लेखक नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांना “द काश्मीर फाईल्स” सिनेमाची कमाई काश्मिरी ब्राह्मणांसाठी दान करण्याचा सल्ला दिला आहे. आता त्यामध्ये महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांची देखील भर पडली आहे.



    जयंत पाटलांचा विधानसभेत सल्ला

    जयंत पाटलांनी देखील विवेक अग्निहोत्रींनी 17 कोटींच्या सिनेमातून 150 कोटी रुपये कमावले आहेत. त्यातला काही हिस्सा काश्मिरी पंडितांसाठी घरे बांधण्यासाठी द्या, असा शहाजोग सल्ला विवेक अग्निहोत्री यांना दिला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाचा उल्लेख केल्यानंतर मध्येच उभे राहून जयंत पाटलांनी येणे हा शहाजोग सल्ला दिला आहे.

     नवाब मलिक आत

    जयंत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक हे दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा राजीनामा घेण्याची राजकीय तसदी देखील शरद पवार घ्यायला तयार नाहीत आणि जयंत पाटील मात्र “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाने 150 कोटी रुपयांची कमाई केली म्हणून पोटदुखी झाल्यासारखे विवेक अग्निहोत्रींना सिनेमाची कमाई काश्मिरी पंडितांसाठी दान करण्याचा शहाजोग सल्ला देताना दिसले आहेत.

    The Kashmir Files: Ignoring Bollywood’s Money Laundering; Niyaz Khan, Jayant Patil’s “Shahjog advice” to donate money to Vivek Agnihotri for Kashmiri Pandits !

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !