वृत्तसंस्था
चाकण : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवाला जबाबदार असलेला चाकण येथील चौक राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पराभवाचे कारण भविष्यात बनू शकतो. कारण लोकसभा निवडणूक होऊन दोन वर्षे झाली तरी या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. The issue of traffic congestion in Chakan is still the same; Dr.Amol Kolhe On the way to Adhalrao; No actual action in two years
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांसाठी चाकण चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी खासदार अमोल कोल्हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या होत्या. मात्र, काही सूचनांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. बैठक केवळ नावापुरतीच झाल्याची चर्चा सुरु आहे. अवजड वाहनांएवजी हलक्या वाहनांनी पर्यायी रस्ता वापर करण्याचा सूचना फलक वाहतूक विभागाने लावला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर बस, खासगी थांबे आहे तिथेच आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून गोडवाणीची समस्येवर मलमपट्टी लावली जात आहे. त्यामुळे बैठक नेमकी कशासाठी होती असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
खासदार कोल्हे यांच्या बैठकीत चाकण चौकातील वाहतुककोंडी सोडवण्यासाठी चाकणमध्ये १५ दिवसांसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही पर्यायी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला नाही. दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी हलक्या वाहनांना या मार्गावरून बंदी घालून त्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सूचनाफलक लावला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसते. हलकी वाहनेसुद्धा याच मार्गावरून मार्गस्थ होताना दिसत आहे. तर चौकापासून १०० मीटर पर्यंत नो पार्किंग झोन करण्याचे सुचवले होते. त्यामुळे बस आणि खासगी थांबे इतरत्र हवलणे आवश्यक होते. तसे फलक सुद्धा लावले अथवा तशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या तिथेच बसथांबे असल्याचे गर्दी होत आहे.
The issue of traffic congestion in Chakan is still the same; Dr.Amol Kolhe On the way to Adhalrao; No actual action in two years
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?