विनायक ढेरे
जळजळ थांबता थांबेना
बरनॉर्ल पुरता पुरेना
माकड म्हणून भाजपला
वाघाचे म्याव ते थांबेना
काय करावे मोदीला
त्याची लाट आटोपेना
यूपी जिंकूनिया आता
तो पोचला गुजरातला
संजय म्हणे काका
या मोदीला आवरा
काका म्हणे कसे करू
तो ईडीच थांबवेना
भरली शेवटची घटका
नोटा मोजता मोजता
मोडली तरी म्हणती
ताठ आमच्या त्या माना
( व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)