• Download App
    आसुरी प्रवृत्तीने पीडित जगाला भारतीय सनातन संत परंपरा मार्गदर्शक; सरसंघचालकांचे प्रतिपादन The Indian Sanatan Sage Tradition Guide to a World Suffering from Demonic Tendencies

    आसुरी प्रवृत्तीने पीडित जगाला भारतीय सनातन संत परंपरा मार्गदर्शक; सरसंघचालकांचे प्रतिपादन

    प्रतिनिधी

    मुंबई : आसुरी प्रवृत्तीने पीडित असलेल्या जगातल्या देशांना आज भारतातली संत आणि सनातन परंपरा मार्गदर्शन करत आहे. अशुभ शक्तीमुळे युरोप आणि अमेरिका आज जवळजवळ नष्ट होत आहे पण भारतातली सनातन संत परंपरा त्यांना सधर्म सद्भाव आणि सदाचार शिकवत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. The Indian Sanatan Sage Tradition Guide to a World Suffering from Demonic Tendencies

    मुंबई महानगरातील नंदनवनात चातुर्मास करणार्‍या जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे एकादशमाधिशास्ता, युगप्रधान, आचार्यश्री महाश्रमणजींच्या मंगल सानिध्यात आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आले. आचार्यश्रीच्या प्रवास कक्षात पोहोचल्यानंतर त्यांनी आचार्यश्रींचे आशीर्वाद घेतले. मोहन भागवतांनी आचार्यश्रींशी काही वेळ संवाद देखील साधला आणि त्यानंतर आचार्यश्री महाश्रमणजींसह मुख्य प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी तीर्थंकर समवसरण येथे आले.

    युगप्रधान आचार्यश्री महाश्रमणजी यांनी उपस्थित विशाल जनसमुदायाला पवित्र पाथेय प्रदान करताना सांगितले की, “सर्वसाधारणपणे केवळ मानवच नाही तर प्राणी, पक्षी आणि कीटकही जीवन जगतात. माणसाने मानवी जीवन का जगावे ? हा प्रश्न आहे. एखाद्याच्या जीवनाचे ध्येय अनेक संदर्भात निश्चित केले जाऊ शकते, परंतु धर्मग्रंथावरून मनुष्याने आपल्या पूर्व कर्मांचा क्षय करून आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी जीवन जगण्याचा यत्न केला पाहिजे. आत्मा शाश्वत आहे, आत्मा अविनाशी, अक्षय आहे.

    ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा देखील एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आत्मा कर्माने बांधलेला असतो. माणसाने आपल्या भूतकाळातील कर्मांचा क्षय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी आपले जीवन व्यतीत केले पाहिजे.भारतीय संत-परंपरेत साधू आणि ऋषी बनून आत्मोन्नतीसाठी प्रयत्न केला जातो.अहिंसा, संयम आणि तपश्चर्येने आपला आत्मा शुद्ध,निर्मळ होऊ शकतो.

    भारतात ग्रंथ, संप्रदाय आणि संतांची उज्ज्वल, उदात्त परंपरा आहे. त्यांचा यथार्थ उपयोग करून स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ समाज, स्वस्थ राष्ट्र आणि स्वस्थ जग निर्माण करण्यासाठीही प्रयत्न करता येतील. माणसाने आपल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे चातुर्मास कार्यक्रमात आगमन झाले आहे. ते एक चांगले व्यक्तिमत्व आहे. प्रचारक ही काही बाबतीत संन्यासीच असतो. तुम्ही राष्ट्र, धर्म आणि अध्यात्माची सेवा करत राहा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनेने कार्य करत असताना आध्यात्मिक विकास करत राहो.”

    डॉ. मोहन भागवत जी म्हणाले की, आचार्यश्री महाश्रमणजीसारख्या राष्ट्रसंतासमोर बोलणे मला आवश्यक वाटत नाही, परंतु आचार्यश्रींनी आज्ञा केली असल्याने मला बोलावे लागेल. पूज्य आचार्यश्री लोकांना अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताच्या भूमीवर अशा दिव्य संतांचा अविरत प्रवाह हे भारताच्या चिरंतन परंपरेचे अनुपम सौभाग्य आहे.

    आज भारतातील संत आणि सनातन परंपरा आसुरी प्रवृत्तीने पीडित जगाला मार्गदर्शन करत आहेत. आचार्यश्रींकडून प्रेरणा घेऊन स्वतःला सक्षम,आत्मनिर्भर बनवण्याची जबाबदारी आपली आहे. आज अमेरिका आणि युरोप अशोभनीय आणि अशुभ शक्तींमुळे जवळजवळ नष्ट होत आहेत. भारत त्यांना योग्य धर्म, सद्भाव आणि सदाचार शिकवत आहे.

    पूज्य आचार्यश्री महाश्रमणजींसारख्या संतांच्या प्रेरणेने आपण मार्गक्रमण करू, तेव्हाच आपण इतरांना मार्ग दाखवू शकू. भयाचे निवारण धर्माचरण केल्याने होते, भीती दूर होते. अध्यात्मिक ऊर्जा मिळावी म्हणून मी आचार्यश्रींकडे येत असतो. अशा दैवी संताच्या केवळ दर्शनानेच जीवन सुखकर होते, असा माझा विश्वास आहे.”

    मोहन भागवतांना आशीर्वाद प्रदान करताना आचार्यश्री म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात भागवतजींचेही संबोधन झाले. अशा चांगल्या संबोधनातून समाजाला आणि राष्ट्राला खूप प्रेरणा मिळते. चातुर्मास प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष मदनलाल ताटेड यांनी स्वागत संबोधन केले.

    मंगल प्रवचनानंतर, मोहन भागवत यांनी प्रमुख आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या ५० व्या दीक्षा कल्याण महोत्सव वर्षाच्या संदर्भात जैन श्वेतांबर तेरापंथी महासभेने बनवलेल्या ‘महाश्रमणा कीर्तिगाथा’ या भव्य प्रदर्शनालाही भेट दिली. आचार्यश्रींच्या जीवनातील प्रसंगांचे चित्रण, रूपरेषा आणि आधुनिक उपकरणांद्वारे सादरीकरण पाहून आश्चर्यमिश्रित प्रसन्नतेची अनुभूती डॉ. मोहन भागवतांनी घेतली.

    The Indian Sanatan Sage Tradition Guide to a World Suffering from Demonic Tendencies

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!