विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या विजयावर झाला नाही, अशी मखलाशी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आज प्रकाश आंबेडकरांचा प्रचंड संताप उसळला. The INDIA alliance did not want an independent Bahujan leadership in the Parliament.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सविस्तर पोस्ट लिहून सगळा संताप बाहेर काढला. INDI आघाडीला फक्त बहुजनांची मते हवी आहेत, पण बहुजन नेतृत्व त्यांना संसदेत विकसित होऊ द्यायचे नाही. त्यांनी कितीही प्रयत्न करू देत, परंतु संसदेत बहुजन नेतृत्व विकसित होईलच आणि पुन्हा उसळी मारून वर येऊ, अशा शब्दांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी INDI आघाडीवर प्रखर हल्लाबोल केला.
या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात :
INDI आघाडीला फक्त बहुजनांची मते हवी होती. अजून काही नाही. INDI आघाडीला संसदेत स्वतंत्र बहुजन नेतृत्व नको होते. त्यांनी बाबासाहेबांना वेठीस धरले आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले. हे पक्ष तेच आहेत, ज्यांनी प्रथमतः राज्यघटनेला सुरुंग लावला आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA 1 आणि 2 जेव्हा संविधानात दुरुस्त्या करत होते, तेव्हा तेच मूक दर्शक बनून संसदेत बसून राहिले होते.
स्वतःचे राजकारण साधून घेण्यासाठी INDI आघाडीतले पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाच्या मागे लागले होते. या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून त्यांना त्यांचे उद्ध्वस्त राजकीय गण्या आणि वाडे वाचवायचे होते आणि नव्याने उभारायचे होते.
मात्र त्या प्रक्रियेत बहुजनांनी संसदेत स्वत:चे स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभे करण्याची आणि निर्माण करण्याची संधी गमावली.
आमचा लढा नेहमीच संविधान वाचवण्यासाठी राहिला आहे. तेच आमचे तत्वज्ञान आहे. त्यांच्याकडून बहुजन मतदारांना किती वेळा फसणार? बहुजन मतदारांची पुरती फसवणूक आणि फसवणूक तर झाली नाही ना?? या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिकदृष्ट्या उपेक्षित आणि भेदभावग्रस्तांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरज भासली नसती. बाबासाहेबांनी देखील स्वतंत्र मजूर पक्ष, अनुसूचित जाती फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली नसती. जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम यातून आपण ताकद काढतो. आमचा लढा सुरूच राहील. आम्ही परत बाउन्स बॅक करू!!
प्रकाश आंबेडकरांच्या या पोस्ट नंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
The INDIA alliance did not want an independent Bahujan leadership in the Parliament.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेकिंग न्यूज मधून देश चालणार नाही, मंत्र्यांची नावे ठरणार नाहीत; मोदींच्या माध्यमांना कानपिचक्या, तरीही बातम्यांची पतंगबाजी सुरूच!!
- मोदींच्या हॅटट्रिक शपथविधीचा मुहूर्त ठरला; स्थळ : राष्ट्रपती भवन, 9 जून 2024 सायंकाळी 7:15!!
- राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती; 9 जून रोजी NDA मंत्रिमंडळाचा शपथविधी!!