नाशिक : “पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था येऊन ठेपली आहे. Ajit Pawar’s NCP
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सुरुवातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी शेअर केला. त्यावर आपण रमी खेळत नव्हतो. तिची जाहिरात स्कीप करत होतो, असा खुलासा कोकाटे यांनी केला. परंतु हा खुलासा योग्य नसल्याचा स्पष्ट खुलासा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. माणिकरावांनी शेतकऱ्यांच्या बद्दल आधीच काही वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यावरून राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिली, असेही सुनील तटकरे म्हणाले. थोडक्यात कोकाटेंनी हा इशारा समजून कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशा पद्धतीचे हे सूचक वक्तव्य ठरले. पण माणिकराव कोकाटेंनी खुर्ची सोडली नाही. ते खुर्चीला चिटकूनच राहिले.
याच दरम्यान सुरज चव्हाणचे मारामारी प्रकरण समोर आले. ते पेल्यातले वादळ ठरण्यापेक्षा कोकाटे प्रकरणात आगीत तेल ओतणारे ठरले. त्यामुळे अजित पवारांनी आपण फार मोठी कारवाई करत असल्याचे दाखवत सुरज चव्हाणला फक्त राजीनामा द्यायची सूचना केली. त्या पाठोपाठ त्याचा राजीनामा घेतला. पण पोलिसी कारवाई संदर्भात कुठलेही उघड वक्तव्य केले नाही. मराठी माध्यमांनी मात्र अजित पवारांच्या “कठोर” कारवाईची भलामण केली.
– मोठा मासा + छोटा मासा
त्यामुळे अजित पवारांच्या कारवाई विषयी संशय वाढला माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी घेतला, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
– माणिकरावांचे आणखी दोन व्हिडिओ
त्या पाठोपाठ विधिमंडळ मारामारी फेम जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे यांचे ऑनलाइन जुगार खेळत असल्याचे दोन व्हिडिओ शेअर केले. त्यात माणिकराव जुगाराचे पत्ते वर खाली हलवताना आढळले. हे माणिकराव कोकाटे जुगारच खेळत असल्याचे पुरावे असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. याच दरम्यान मूळात माणिकरावांचा हा व्हिडिओ सत्ताधारी पक्षापैकीच कुणीतरी शूट केला आणि राजकीय हिशेब साधण्यासाठी तो इतरांकडून शेअर करून घेतला, अशी बातमी पसरली. अर्थातच या सगळ्या कारवाया “पवार संस्कारितां”च्याच होत्या, पण मधल्या मध्ये बदनामी मात्र फडणवीस सरकारची झाली.
– फडणवीस अजूनही मवाळ
कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याची संधी अजून घेतली नाही. नवाब मलिक प्रकरणात ते जसे आक्रमक झाले होते तशी आक्रमकता दाखवून फडणवीसांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीची नांगी अजून तरी ठेचली नाही.
The image of Devendra fadnavis government damaged due to Ajit Pawar’s NCP
महत्वाच्या बातम्या
- “पवार संस्कारितां”ची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!
- CAG : कॅगचा ठपका: शासनाच्या योजनांत 13 हजार कोटींच्या अनुदानाचा हिशेब नाही
- शिंदे + अजितदादांच्या मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे ठाकरे + शशिकांत शिंदेंनी साधली फडणवीसांना घेरायची संधी; पण “सफाई”ची संधी फडणवीस कधी साधणार??
- जागतिक शांतीसाठी ‘हिंदू प्रारूप’ विकसित करणार; संघाच्या प्रांतिक समन्वय बैठकीत शताब्दी वर्षाचे नियोजन