• Download App
    The hunger strike was called off, but Anna said

    उपोषण मागे घेतले, पण अण्णा म्हणाले, या सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही!!

    प्रतिनिधी

    अहमदनगर : सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारने काही पावले मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उपोषणाचा निर्णय रद्द केला. पण या सरकारच्या राज्यात जगण्याची आपली इच्छा नाही, असे परखड बोल देखील त्यांनी ठाकरे – पवार सरकारला ऐकवले.The hunger strike was called off, but Anna said

    राज्याच्या महसूल सचिव वत्सला नायर या राज्य सरकारच्या वतीने अण्णा हजारे यांना भेटल्या. त्यांच्याशी 3 तास चर्चा केली. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करणार नाही. त्यासाठी जनतेकडून हरकती आणि सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन या पत्रामध्ये सरकारने अण्णांना दिले आहे. याखेरीज राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी देखील ग्रामसभेत ठराव मंजूर करून अण्णांना उपोषण करू नये, अशी विनंती केली. ग्रामसभेचा ठराव अण्णांनी मान्य केला. उपोषण सध्या स्थगित ठेवले.


    सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे करणार प्राणांतिक उपोषण, अजित पवार यांना पाठविले स्मरणपत्र


    परंतु त्याचवेळी अण्णांनी हे सरकार फसवे आहे. सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याचा या सरकारचा डाव 2001 सालापासूनचा आहे, असा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे सगळीकडे दारूबाजी करायला निघाले आहेत. तरुण पिढीला त्यांना व्यसनाधीन बनवायचे आहे का?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर या सरकारच्या राज्यात मला अजिबात जगण्याची इच्छा नाही, असे वक्तव्य अण्णा हजारे यांनी करून ठाकरे – पवार सरकारच्या नियती वरच त्यांनी बोट ठेवले आहे.

    The hunger strike was called off, but Anna said

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक