विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतुदींत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. The honorarium of teachers of medical colleges will be increased
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल सादर करण्यात आला. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
फोर्ट, मुंबई येथील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन वापरासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली.
सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा प्रस्ताव दिला होता.
The honorarium of medical college teachers will be increased
महत्त्वाच्या बातम्या
- UP Elections : ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ घोषणेला पक्षातूनच छेद, काँग्रेस महिला उमेदवाराचा ढसढसा रडत जिल्हाध्यक्षावर गंभीर आरोप, निवडणूक लढण्यास नकार
- मंत्रालयांनी कसे केले कचऱ्याचे कॅफेटेरिया अन् वेलनेस सेंटर्समध्ये रूपांतर, अशी स्वच्छता मोहीम जिने प्रशासकीय कामात सौंदर्य भरले
- लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा