• Download App
    देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक; गांधीजींना राष्ट्रपिता संबोधणे अयोग्य; रणजीत सावरकर यांचे प्रतिपादन |The history of the country is more than five thousand years; It is inappropriate to call Gandhiji the Father of the Nation; Statement by Ranjit Savarkar

    देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक; गांधीजींना राष्ट्रपिता संबोधणे अयोग्य; रणजीत सावरकर यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारतासारख्या महान देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक आहे. या देशा देशाच्या उभारणीत हजारो लोकांचे योगदान आहे. त्यांचे योगदान विसरले गेले. त्यामुळे कोणा एका व्यक्तीला राष्ट्रपिता म्हणून संबोधणे योग्य नाही, असे परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीढत सावरकर यांनी व्यक्त केले आहे.The history of the country is more than five thousand years; It is inappropriate to call Gandhiji the Father of the Nation; Statement by Ranjit Savarkar

    महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार सावरकरांनी प्रत्येक कैद्याला उपलब्ध असणारा दया याचना करण्याचा मार्ग स्वीकारला होता, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राजनाथ सिंह आणि सावरकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. संघाचे लोक महात्मा गांधींना बाजूला सारून सावरकरांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील, अशी टीका हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली होती.



    आज दिवसभर सावरकर – महात्मा गांधी आणि तथाकथित माफीनामा या विषयावर जोरदार वाद विवाद झाले. या पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी वरील मत व्यक्त केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रणजीत सावरकर म्हणाले, की या देशाचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा अधिक आहे.

    या महान देशात कोणा एका व्यक्तीला राष्ट्रपिता संबोधणे हे अयोग्य आहे. हजारो लोकांचे हा देश उभारण्यात हजारो लोकांचे योगदान आहे. ते विसरले गेले आहे. मूळात एवढ्या मोठ्या देशाला कोणी राष्ट्रपिता असू शकतो ही संकल्पनाच मला अमान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    The history of the country is more than five thousand years; It is inappropriate to call Gandhiji the Father of the Nation; Statement by Ranjit Savarkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!