• Download App
    शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ; यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला मोठा दिलासाThe government strongly supports the affected citizens; Yashomati Thakur gave great relief to the farmersb

    शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ; यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला मोठा दिलासा

    तिवसा व भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.The government strongly supports the affected citizens; Yashomati Thakur gave great relief to the farmers


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे जात आहे. यादरम्यान पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा दिला आहे.

    अवकाळी पाऊस, वादळ व अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात नागरिकांच्या घरांची पडझड व खूप नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. त्या संबंधातील तिवसा व भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.



    आपद्ग्रस्तांना धनादेशाचे वाटप

    तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील ५३ व साऊर येथील १७५ आपद्ग्रस्तांना धनादेशाचे वाटप श्रीमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाले त्यासाठी १८ कोटी ६० लक्ष रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती ठाकूर यांनी दिली.

    पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की , सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी व पंचनामे प्रक्रिया पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना लवकरच मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    The government strongly supports the affected citizens; Yashomati Thakur gave great relief to the farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते