• Download App
    सरकारने खुशाला चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडी सरकारला खुले आव्हान|The government should investigate and get the result within a month, Chandrasekhar Bavankule's Mahavikas Aghadi openly challenges the government

    सरकारने खुशाला चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडी सरकारला खुले आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्या तीन विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, खुले आव्हान माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.The government should investigate and get the result within a month, Chandrasekhar Bavankule’s Mahavikas Aghadi openly challenges the government

    राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण तापले आहे. मुंबई बँक प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजप आता आक्रमक झाली आहे. त्यानंतर आता भाजपचे माजी ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.



    बावनकुळे म्हणाले, महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील 16 शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा असा यामागचा प्रयत्न असू शकतो.

    देवेंद्र फडणवीस सरकारने लोडशेडींग मुक्त महाराष्ट्र केला. एक शेतकरी एक डीपी योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकºयांना समृद्धीचा मार्ग दाखवला. आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली.

    आमच्या सरकारनेच एलीफेंटाला वीज पोहोचवली. राज्यातील 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांना नव्याने वीज कनेक्शन मिळवून दिले. 45 लाख शेतकºयांना 28 हजार कोटींची वीज दिली. पण इतके चांगले काम करुनही आत्ताच चौकशी का?

    The government should investigate and get the result within a month, Chandrasekhar Bavankule’s Mahavikas Aghadi openly challenges the government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ