• Download App
    लक्ष्मी प्रसन्न : निवडणूक वर्षात खासगी क्षेत्रातही पगारवाढीची आनंदाची बातमी!! The good news of salary increase in the private sector during the election year

    लक्ष्मी प्रसन्न : निवडणूक वर्षात खासगी क्षेत्रातही पगारवाढीची आनंदाची बातमी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : यंदाची दिवाळी आणि पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक पगारवाढीची आनंदाची बातमी घेऊन येत आहे. The good news of salary increase in the private sector during the election year

    सध्या नोकरदार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण अनेकांच्याच खात्यात जमा झालेला दिवाळी बोनस. सणासुदीच्या दिवसांमध्ये खात्यात आलेली ही रक्कम अनेकांनाच मोठा दिलासा देते. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या Appraisals मधून देखील खासगी क्षेत्रात मोठी पगारवाढ अपेक्षित आहे.

    नव्या वर्षाचा पहिला महिना उलटल्यानंतर अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे वार्षिक पगारवाढीचे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून अनेक कंपन्यांमध्ये यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होते. ज्यानंतर महिन्याभराच्या फरकाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची वाढीव रक्कम जमा होते. भारतात पुढील वर्षी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे.

    2024 हे लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वर्ष आहे. महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या निवडणुका देखील अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्याचा सरकारांचे प्रयत्न आहेत. समाजातला कोणत्याही घटकाला नाराज करणे सरकारला परवडणारे नाही. उलट सरकारी, खासगी संघटित आणि असंघटित कामगारांना खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यातूनच पगारवाढ व्यवस्थित होईल याकडे सरकारी पातळीवरील लक्ष ठेवले जात आहे. सरकारच्या निवडणूक व्यवस्थापनातला हा मायक्रो पातळीवरचा महत्त्वाचा घटक आहे

    विलिस टॉवर वॉटसनच्या एका अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील सर्व खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना सरासरी 9.8 % पगारवाढ देऊ शकतात. एकिकडे ही समाधानकारक वेतनवाढीची चर्चा असतानाच दुसरीकडे ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग इंडिया’च्या अहवालानुसार अद्यापही सर्व क्षेत्रांतील कंपन्या त्यांच्या उत्पादन खर्चावर लक्ष केंद्रीत करत असल्यामुळे मोठ्या पगारवाढीबाबत साशंकता आहे. 2023 मध्ये हे सरासरी प्रमाण 10 % टक्क्यांवर होते, 2024 मध्ये मात्र ते 9.8 % टक्के राहील असा तर्क या अहवालातून लावण्यात आला. 

    कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार फायदा? 

    नव्या वर्षामध्ये वस्तू, उत्पादन, औषध निर्माण, माध्यम आणि गेमिंग या क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होऊ शकतो. आयटी क्षेत्रात मात्र याउलट चित्र पाहायला मिळू शकते, असे असले तरीही इतर क्षेत्रांच्या तुलनेत ही पगारवाढ 2 ते 3 % टक्क्यांनी जास्त असेल, असे सांगितले जात आहे.

    The good news of salary increase in the private sector during the election year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस