• Download App
    Manoj Jarange मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करायला हायकोर्टाने केली मनाई;

    Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करायला हायकोर्टाने केली मनाई; पण जरांगेंनी केली फडणवीसांवर आगपाखड!!

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manoj Jarange सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून मुंबईत आंदोलनाचा आग्रह धरणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टाने चपराक हाणली. पुढच्या 15 दिवसांमध्ये मुंबईत आंदोलन करता येणार नाही. आंदोलन करायचे असल्यास नवी मुंबई किंवा ठाणे परिसरात सरकारने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने राज्य शासनाला दिले. पण या सगळ्याचे खापर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले. सरकारनेच खोटी माहिती कोर्टात दिली म्हणून कोर्टाने तसा निर्णय दिला, असा दावा जरांगे यांनी केला.Manoj Jarange

    येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. विशेष म्हणजे एकीकडे गणेशोत्सवाची मुंबईत धूम असताना मनोज जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत येणार आहेत. जरांगे यांनी आपले आंदोलन पुढे ढकलावे, असे आवाहन त्यांना केले जात आहे. पण जरांगेंनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली. असे असतानाच आता त्यांना पहिला मोठा धक्का बसला. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिला आहे. जरांगे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.Manoj Jarange



    हायकोर्टाने नेमका काय निर्णय दिला?

    मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते. जरांगे यांच्या याच आंदोलनाविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दुसरी याचिका ही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. या दोन्ही याचिकांच्या माध्यमातून जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करण्यात आला होता.

    सध्या सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठी गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आला. दोन आठवड्यापर्यंत त्यांना मुंबईत येता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केलंय. परवानगी द्यायचीच झाली तर मुंबईच्या बाहेर नवी मुंबई, ठाण्यासारख्या परिसरात एखाद्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी, असा आदेश हायकोर्टाने दिला. तसेच जरांगे यांनी शांततेत आंदोलन करावे, असेही हायकोर्टाने बजावले.

    – जरांगेंची फडणवीसांवर आगपाखड

    हायकोर्टाने जरांगे यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिल्यानंतर ते भडकले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली. सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली. त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला. आमची टीम आता न्यायालयात जाणार आहे. आम्ही आमची बाजू मांडू, असे जरांगे यांनी सांगितले. तसेच आम्ही शांततेत आमचे आंदोलन करू. पण देवेंद्र फडणवीस त्यात आडकाठी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

    मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना खडसावले.‌ सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत, अशा शब्दांत मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाची स्पष्ट भूमिका स्पष्ट केली. या सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचाही न्यायालयाने हवाला दिला. लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी, निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केली पाहिजेत. मुंबईतील जीवनाचा वेग विस्कळीत होऊ नये म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा द्यायची की नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकते, असेही हायकोर्टाने सांगितले.

    Bombay High Court prohibits Manoj Jarange from fasting at Azad Maidan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : मंत्री शिरसाटांच्या अडचणीत भर; 12 हजार पानांचे सुटकेस भरून पुरावे रोहित पवारांकडून सादर

    Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार

    Ajit Pawar : अजितदादा म्हणाले- शिंदेंच्या खात्यावर सीएम नाराज नाहीत; 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प