• Download App
    गोडसेनीतीचा महिमा मोदी सरकार आल्यानंतर वाढला नवाब मलिक यांची टिका|The glory of Godse policy increased after the coming of Modi government riticism of Nawab Malik

    गोडसेनीतीचा महिमा मोदी सरकार आल्यानंतर वाढला नवाब मलिक यांची टिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गोडसेनीतीचा महिमा वाढवणे, त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला. The glory of Godse policy increased after the coming of Modi government riticism of Nawab Malik

    गुजरात राज्यातील शाळेत नथुराम गोडसे यांच्यावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आल्याच्या व संबंधित शिक्षकावर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर मलिक बोलत होते.



    आठ वर्षे महात्मा गांधी यांचे नांव घेऊन नुसते कार्यक्रम करायचे. महात्मा गांधी यांचं नाव घेतले नाही तर जग आणि देशभरात राजकारण करता येत नाही हे मोदींना मान्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

    गुजरातमध्ये नथुराम गोडसे माझा नायक हा विषय समोर येत असेल तर ते योग्य नाही. आठ वर्षात गोडसेचे महिमामंडन जोरात सुरू आहे ही सत्य परिस्थिती आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

    The glory of Godse policy increased after the coming of Modi government riticism of Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस