विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेले कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात लढत पाहायला मिळेल का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. The former MLA of Kannada left the bow and arrow and tied a watch on his hand! Nitin Patil in NCP ahead of assembly elections
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच आमदार महायुतीचे होते. यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ सोडता इतर सर्व शिवसेनेचे आमदार हे शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघाची चर्चा चांगलीच रंगली होती. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीपूर्वी कन्नड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे कन्नड विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अचानक नितीन पाटील यांनी अजित पवार यांचा पक्षात प्रवेश केल्यामुळे आता हा मतदार संघ अजित पवार यांना सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कन्नडमध्ये तिहेरी लढत
कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेकडून निवडून आले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षांमध्ये देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडून संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने माजी आमदार नितीन पाटील हे मैदानात असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता वाढली आहे. तसेच या मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे सध्या कोणत्याच राजकीय पक्षात नसले तरी ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यांचेही या मतदारसंघात मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The former MLA of Kannada left the bow and arrow and tied a watch on his hand! Nitin Patil in NCP ahead of assembly elections
महत्वाच्या बातम्या
- राजस्थानात गुरू-शिष्यांची जोडी! बागडे राज्यपाल, तर विधानसभेत यश मिळवून देणाऱ्या रहाटकर भाजप प्रभारी
- मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पहिल्या रांगेतील स्थानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीला!!
- Manoj Jarange : काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची मनोज जरांगेंची अखेर कबुली; पण नेत्यांचे नाव सांगायला नकार!!
- Manu Bhakar : ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दिला होता धोका, पण यंदा तू…’