• Download App
    The Focus India ‘गप्पाष्टक -४’ : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यास स्वरदा बापट इच्छुक आहेत का? The Focus India Gappashtak 4 Is Swarda Bapat willing to contest the Pune Lok Sabha by election

    The Focus India ‘गप्पाष्टक -४’ : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यास स्वरदा बापट इच्छुक आहेत का?

    जाणून घ्या, स्वरदा बापट यांनी काय सांगितलं आणि भाजपाने  तिकीट नाकारलं तर काय असणार भूमिका

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील  कसबा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार आणि पुणे शहाराचे खासदार राहिलेल्या गिरीश बापट यांचे  मार्च महिन्यात  निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे शहर खासदार पदाच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष मोर्चेबांधणीही करत आहेत. दरम्यान, आता या जागेवर भाजपा गिरीश बापटांच्या कुटुंबातच उमेदवारी देणार  की कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे नवा उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, या निवडणुकीसाठी गिरीश बापट यांचा मुलगा  गौरव बापट आणि  सून  स्वरदा बापट यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या  विशेष मुलाखतीच्या चौथ्या भागात स्वरदा बापट यांनी त्यांची  भूमिका स्पष्ट केली आहे. The Focus India Gappashtak 4 Is Swarda Bapat willing to contest the Pune Lok Sabha by election

    आगामी लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची आपली इच्छा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना स्वरदा बापट म्हणाल्या, ‘’आमच्या पक्षात मूळात असं असतं की, जे काही काम आम्हाला दिलं जातं ते आम्ही करतो. पक्षाने मला प्रदेशात युवा मोर्चाचं उपाध्यक्ष पद दिलं होतं.  त्या अगोदर मी नगरसेविका म्हणूनही काम केलं आहे. पक्ष जे काम देईल ते काम आम्ही करत असतो. परंतु पक्षाकडे  आम्ही अशी कुठलीही मागणी केलेली नाही. पक्षाने संधी नाही दिली तरी आम्ही आमचं कार्य करतच आहोत.’’

    याचबरोबर ‘’सामाजिक काम खूप आहे. बाबांनी(गिरीश बापट) यांनी संस्था उभ्या केल्या आहेत. ओंकारेश्वर मंदिराचा एक ट्रस्ट आहे. अशा अनेक संस्थांमधून कामं सुरू आहेत. त्यामुळे कामाला कमी नाही आणि त्यासाठी पद पाहिजे असंही नाही. लोकांची कामं करायला सदैव आम्ही तयार असतो. पक्ष जे ठरवतो त्यानुसार आम्ही काम करतो. ’’ असंही स्वरदा बापट यांनी स्पष्ट केलं.

    महाराष्ट्रातील  सर्वपक्षीय नेत्यांशी अगदी विरोधकांशीही सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध असणारा नेता म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती. परंतु  पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू असे हे व्यक्तिमत्त्व २९ मार्च रोजी काळाने आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या जाण्याने खरंतर केवळ पुणे शहराचीच नाहीतर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राचीही मोठी हानी झाली.

    The Focus India Gappashtak 4 Is Swarda Bapat willing to contest the Pune Lok Sabha by election

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा