• Download App
    शाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊलThe first step in the construction of Shahu Maharaj's memorial in Kolhapur

    शाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार; कोल्हापुरात शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कामातले पहिले पाऊल

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा शाहू मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे. The first step in the construction of Shahu Maharaj’s memorial in Kolhapur

    श्री शाहू मिलच्या जागेवर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक व्हावे ही कोल्हापूरकरांची जुनी मागणी आहे. शासन स्तरावर अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता शिंदे फडणवीस सरकारने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    या पोस्टमध्ये चंद्रकांतदादा पाटील म्हणतात :

    • श्री शाहू मिलच्या जागेवर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे महान कार्य हे एक आदर्श राजवट म्हणून पुढील पिढ्यांच्याही स्मरणात राहतील असे भव्य स्मारक उभारण्यात यावे ही कोल्हापूरकरांची इच्छा लवकरच मूर्त स्वरूप धारण करेल.
    • रोजगार निर्मिती हा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत व द्रष्ट्या विचारांचा आदर्श समोर ठेवून ‘राजर्षी छत्रपती शाहु स्मृती’ आणि विचार जतन समितीने कोल्हापूरकरांच्या प्रतिष्ठेचा विषय असलेली ही मिल पुनर्जीवित करण्याचे देखील सुचवले असून त्यासाठी या समितीने केलेल्या शिफारशी शासनाच्या विचाराधीन आहेत. काही मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून सर्व प्रथम या मिलचा भोंगा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
    • भोंगा वाजविण्यासाठी शासन स्तरावर घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम सहा महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच, मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी समितीची असणार आहे. या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

    The first step in the construction of Shahu Maharaj’s memorial in Kolhapur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस