• Download App
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत आज अंतिम निर्णय!, समितीच्या बैठकीत कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब? The final decision regarding the leadership of NCP will be made today

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत आज अंतिम निर्णय!, समितीच्या बैठकीत कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

    शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मोठी राजकीय खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्या छोट्या कार्यकर्त्यापासून ते अगदी वरिष्ठ नेत्यापर्यंत सर्वांसाठीच हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्हाला हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. The final decision regarding the leadership of NCP will be made today

    आज होणाऱ्या बैठकीनंतरच राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण असणार की शरद पवारांकडेच हे पद कायम राहणार? किंवा मग आणखी दुसरा काही पर्याय तयार होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. शरद पवारांनीही काल कार्यकर्त्यांना या बैठकीनंतर तुम्हाला अशाप्रकारे बसून रहाण्याची वेळ येणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

    पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावासाठी राष्ट्रवादीच्या १६ सदस्यीय समितीची आज (शुक्रवार) बैठक होत आहे. पवारांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा या कार्यकर्त्यांच्या मागणीवर ही समिती यावेळी विचार करू शकते. या बैठकीत पवार अध्यक्षपदी कायम राहावे, तर नियमित कामासाठी कार्यवाह अध्यक्ष नेमण्यात येईल, असाही प्रस्ताव येऊ शकतो.

    जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी पवार यांची भेट घेतली आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. जयंत पाटील म्हणाले, मागील दोन दिवसांत मी ज्यांना भेटलो त्या सर्वांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहचवल्या आहेत.

    शरद पवार काल काय म्हणाले होते? –

    प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना उद्देशून म्हटले होते की, ‘’मला खात्री होती की जर मी राजीनामा देत असल्याचं जाहीर करण्याअगोदर तुमच्याशी चर्चा केली असती, तर तुम्ही होय म्हणाला नसता. तुमच्या भावनांचा आदर केली जाईल. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर आपण निर्णय घेऊ. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही.’’

    The final decision regarding the leadership of NCP will be made today

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू