• Download App
    कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं ; निलेश राणे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर ट्विटद्वारे केली टीकाThe face of a pervert like Kuber was going to be blackened today or tomorrow; Nilesh Rane tweeted criticism of Girish Kuber

    कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं ; निलेश राणे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर ट्विटद्वारे केली टीका

    वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.The face of a pervert like Kuber was going to be blackened today or tomorrow; Nilesh Rane tweeted criticism of Girish Kuber


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे.आज या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस होता.दरम्यान या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेवर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरु आहे. कार्यक्रमाची सांगता होत असताना वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.



    दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे.यावर निलेश राणे म्हणाले की , “छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या कुबेर सारखा विकृताचे तोंड काळे केले.आणि ते आज ना उद्या होणारच होतं.” आणि जे कोणी हे काम केलं आहे त्यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दात गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकलेल्या कृत्याचं समर्थन केलं आहे.

    गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या ‘Renaissance State’ या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. यावरून महाराष्ट्र भर वाद सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती.

    The face of a pervert like Kuber was going to be blackened today or tomorrow; Nilesh Rane tweeted criticism of Girish Kuber

    Related posts

    आणीबाणी मध्ये जयप्रकाशांची संपूर्ण क्रांती समाजवाद्यांनी सोडून दिली वाऱ्यावर; संघाच्या स्वयंसेवकांनी चालविले आंदोलन!!

    आणीबाणीच्या काळ्या पर्वावरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; पण इंदिरा गांधींनी come back कसे केले सांगण्यावर काँग्रेसचा भर!!

    Eknath Shinde : अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा; निधी कुठे वितरीत होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश