अमरावतीत झालेल्या जातीय दंगलींनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि संदेश पाठविण्याऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. The entire market will be open in Amravati from 7 am to 9 pm today
विशेष प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड सुद्धा झाली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे.संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे.
आज पासून ( 23 नोव्हेंबर ) सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदीत सूट देण्यात आली आहे तर रात्री 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. असा पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आदेश दिला आहे.
अमरावतीत झालेल्या जातीय दंगलींनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि संदेश पाठविण्याऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल झाले असून एकूण ३१२ जणांना अटक करण्यात आली आहे.
The entire market will be open in Amravati from 7 am to 9 pm today
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं