विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : NCP : काकांच्या हातातून पक्ष निसटला, निवडणूक आयोगाने पुतण्याच्या पारड्यात पक्ष टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला शरद पवारांना स्वतःच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवण्यासाठी उद्या 7 फेब्रुवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. The Election Commission put the party in the hands of ajit pawar
महाराष्ट्राच्या इतिहासात आणि शरद पवारांच्या 60 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत 6 फेब्रुवारी 2024 हा दिवस अत्यंत निर्णय ठरला त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कायदेशीर निकाल निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात दिला. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ घेऊन आणि 10 सुनावण्या करून निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींची संख्या प्रतिनिधींची संख्या तसेच अन्य कायदेशीर बाबींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे सोपवले.
शरद पवारांसाठी त्यांच्या राजकीय कारकीर्द घेतला हा सगळ्यात मोठा धक्का आहे सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवारांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाली होती त्यानंतर त्यांनी पी ए संगमा आणि तारीख अन्वर यांच्या साह्याने 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून स्वतःच घड्याळ चिन्हाची निवड केली होती मात्र हे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांच्या हातातून 25 व्या वर्षी निसटला.
आपणच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहोत पक्ष संघटना आपणच चालवतो आपल्याकडेच पक्ष संघटनेचे बहुमत आहे वगैरे दावे शरद पवारांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर केले होते. परंतु त्या संदर्भातले अपेक्षित असणारे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करताना पवार गटाला अवघड गेले.
त्या उलट शरद पवारांनी कायद्याने नव्हे तर स्वतःच्या मनमानीने पक्ष चालवला. पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या नाहीत. त्यांनी कायम नियुक्त्या आणि नेमणुकाच केल्या, अशा आशयाचे आरोप अजित पवार गटाने निवडणूक आयोगात केले. हे सगळे आरोप निवडणूक आयोगाने कागदपत्रांसह स्वीकारले आणि नियमानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्या पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे सोपवले. अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातला भूकंप झाला आहे. वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांना पक्षीय पातळीवर नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.
The Election Commission put the party in the hands of ajit pawar
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!