नाशिक : ज्या जिल्ह्यातून पवार नेहमी टाकतात “डाव”; त्याच जिल्ह्यात तुतारीतून आवाज येत नाय; जिल्ह्यातल्या चार आमदारांनी मोडली तुतारी!!, अशी अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यात झाली.The district from which Pawar always makes “plots”; In the same district, no sound is coming from the trumpet; Four MLAs from the district broke the trumpet!!
शरद पवारांनी डाव टाकल्याच्या खेळी केल्याच्या जेवढ्या म्हणून बातम्या येतात, त्या सगळ्या बातम्या प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातल्याच असतात. “डाव” टाकायला आणि “खेळी” करायला शरद पवारांचा आवडता जिल्हा सोलापूर असल्याचा समज त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलाय.
– 10 पैकी 4 आमदार तुतारीचे, पण…
2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 10 आमदार निवडून आणता आले. त्यातले चार आमदार सोलापूर जिल्ह्यातले आहेत. पण नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीत या चार आमदारांपैकी एकाही आमदाराने तुतारी चिन्हावर आपापल्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायतींमध्ये पॅनेलच उभे केलेले नाही. शरद पवारांच्या चौघाही आमदारांनी आपापल्या सोयीनुसार भूमिका बदलून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच विरोधात काम चालवलेय.
- Eknath Shinde : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन
– राजू खरेंचे पॅनल तुतारीचे नाही
मोहोळ मध्ये राजू खरेंचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सूत जुळले आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली असली तरी निवडून आल्यानंतर सहाच महिन्यात त्यांनी पक्षाला जवळपास रामराम ठोकल्यात जमा आहे. त्याउलट त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आतून आणि बाहेरून संधान बांधले आहे. म्हणूनच मोहोळ आणि अनगर नगरपंचायतींच्या निवडणुकीत राजू खरे यांनी तुतारी चिन्हावर पॅनेल उभे केलेले नाही.
– जानकरांची शिंदेंना साथ
माळशिरस मधून उत्तम जानकर आमदार असले तरी त्यांनी सुद्धा वोट चोरीचा आरोप वगळता बाकी कुठल्याच मुद्द्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साथ दिली नाही. माळशिरस तालुक्यातल्या अकलूज मध्ये तुतारी चिन्हावर पॅनेल असले तरी त्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा हात आहे. उत्तम जानकर यांचा हात नाही. सांगोल्यातल्या सभेत उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेत हजेरी लावली आणि आपण शहाजी पाटलांना साथ देणार असल्याचे जाहीरही करून टाकले. त्यामुळे उत्तम जानकर यांनी तुतारीला वाटण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले.
– करमाळ्यातही तुतारी नाही
करमाळ्यात आमदार नारायण पाटलांनी तुतारी चिन्हावर पॅनल उभे केलेले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंत जगताप यांनी मदत केल्याच्या उपकारांची परतफेड म्हणून नारायण पाटलांनी जयवंत जगताप यांनाच साथ दिली आहे.
– तुतारीची मते खायला पंढरपुरात स्वतंत्र पॅनेल
माढ्यातून निवडून आलेले अभिजीत पाटील यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सुरुवातीला परिचारकांना धक्का द्यायचा प्रयत्न केला, पण मुंबईतून सूत्रे फिरली आणि अभिजीत पाटलांना स्वतंत्र पॅनल उभे करावे लागले. अभिजीत पाटलांचे स्वतंत्र पॅनल तुतारीची मते खाणार याची चर्चा पंढरपुरात जास्त रंगली.
– सत्ता केंद्रित “संस्कार” चौघांनी पाळले
राजू खरे, उत्तम जानकर नारायण पाटील आणि अभिजीत पाटील या चौघांना शरद पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावून सोलापूर जिल्ह्यातून निवडून आणले. पण सत्तानिष्ठ राहण्याचे मूळचे “पवार संस्कार” या चौघाही आमदारांनी पाळले. त्यामुळेच त्यांनी तुतारी चिन्हाला वाटाण्याच्या अक्षता लावायला कमी केले नाही.
The district from which Pawar always makes “plots”; In the same district, no sound is coming from the trumpet; Four MLAs from the district broke the trumpet!!
महत्वाच्या बातम्या
- SIR False : SIRमध्ये चुकीची माहिती दिल्यास एक वर्ष शिक्षा; निवडणूक आयुक्त म्हणाले- BLO फॉर्ममध्ये OTP मागत नाही
- Delhi-NCR : दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाशी संबंधित नियम बदलले; AQI 200+ असल्यावर ऑफिसच्या वेळा बदलतील
- शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!
- US-Russia : ट्रम्प-पुतिन अधिकाऱ्यांमधील गुप्त बैठकीवरून वाद; युक्रेन युद्ध संपवण्याची योजना येथेच रचल्याचा दावा