• Download App
    काका - पुतण्यांच्या वादाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी!!|The dispute between uncle and nephew is not over yet, Sharad Nishtya is ready to claim 16 seats!!

    काका – पुतण्यांच्या वादाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काका – पुतण्यांच्या राजकीय भांडणाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची लोकसभेच्या 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी, असे चित्र दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधले काका – पुतण्यांचे भांडण निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे. खरी राष्ट्रवादी कोणाची??, याचा फैसला अजून व्हायचा आहे तरी देखील शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेच्या 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी चालवली आहे.The dispute between uncle and nephew is not over yet, Sharad Nishtya is ready to claim 16 seats!!

    आत्तापर्यंत तरी अखंड राहिलेली काँग्रेस, फूट पडलेली राष्ट्रवादी आणि फूट पडलेली शिवसेना अशी महाविकास आघाडी आता उरली आहे. या महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा अजूनही सुरू झाली नसली तरी शरद पवार गटाने लोकसभेच्या 16 जागांवर आपली ताकद असल्याचा दावा करत, या जागा लढवण्याचे सूतोवाच केले आहे.



    बारामती, बीड, हातकणंगले, कोल्हापूर, रावेर, सातारा, सांगली, भंडारा, ईशान्य मुंबई, माढा, शिरूर आणि मावळ आणि अहमदनगर या 13 लोकसभेच्या जागांवर शरद पवार गटासाठी अत्यंत सकारात्मक वातावरण आहे, येथे पक्षाला हमखास यश मिळेल असा शरदनिष्ठांचा दावा आहे. मराठवाड्यातील बीड या जागेनंतर छत्रपती संभाजीनगर आणि अन्य 2 जागांचीही शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे.

    अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा या निर्णय कसाही आला तरी शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होणार असल्याचे काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

    मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीतून हे सिद्ध झाले नाही, तर त्याच्या उलट आकडेवारी आली. शरद पवारांची राष्ट्रवादी पाचव्या स्थानावर फेकली गेली. तरी देखील शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते लोकसभेच्या 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी करून बसले आहेत.

    The dispute between uncle and nephew is not over yet, Sharad Nishtya is ready to claim 16 seats!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस