• Download App
    Ramtech Bungalow : अपशकुनी रामटेक आणि वास्तुशास्त्राप्रमाणे दालने

    Ramtech Bungalow : अपशकुनी रामटेक आणि वास्तुशास्त्राप्रमाणे दालने नसल्याने मंत्र्यांची नाराजी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: Ramtech Bangala  महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर बंगले आणि दालन यांचे वाटप झाल्यावर नाराजी निर्माण झाली आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे दालने नसल्याने अनेक मंत्री नाराज झाले आहेत. तर बंगल्यांच्या वाटपावरूनही अस्वस्थता आहे. Ramtech Bungalow

    मंत्रालयीन वर्तुळात नारायणराव दाभोळकर मार्गावरील प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला अपशकुनी मानला जातो. कारण या बंगल्यात वास्तव केलेल्यांवर एकतर बालंट येते किंवा त्यांचे मंत्रीपद जाते. ताजे उदाहरण दीपक केसरकर यांचे देता येईल. हा बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी वाटप झाल्याच आदेश दुपारी निघाला होता. पण नंतर सूत्रे हलली आणि ‘रामटेक’ निवासस्थान पंकजा मुंडे यांना देण्यात आले. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते.



    राधाकृष्ण विखे पाटील यंना पूर्वीचा रॉयलस्टोन, पंकजा मुंडे यांना रामटेक, शंभुराज देसाई यांना मेघदूत बंगले देण्यात आले आहेत. मंत्रालयासमोरील पावनगड बंगला गणेश नाईक यांना देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांचा सिंहगड बंगला कायम ठेवण्यात आला. अगोदर मंत्रीपदावरून, नंतर खतेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती. आता बंगले वाटपावरूनही मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

    विश्वासात न घेता दालन, बंगले वाटप करण्यात आल्याने काही मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बघून दालन व बंगले घेत असतात. पण वाटपाचे थेट आदेश आल्याने मंत्री गडबडून गेले. मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्याएवढी दालने उपलब्ध नसल्याने तीन राज्यमंत्र्यांचो कार्यालये विधान भवनात उभारण्यात आली आहेत.

    महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास विलंब लागला होता. या तुलनेत मंत्र्यांची दालने व बंगल्याचे वाटप तात्काळ करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश दिले. पण हे वाटप होताच काहो मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तर काही जणंनी दालने बदलून देण्याची मागणी केली. बहुतांशे जुन्या मंत्र्यांची दालने व बंगले कायम ठेवण्यात आले.

    महायुतीच्या ३३ मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. बावनकुळे चनकुळे यांना मंत्रालय विस्तार इ‌मारतीतील पहिल्या मजल्यावर पाच दालनांचे एक दालन जाहीर झाले आहे. याच इमारतीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाचव्या मजल्यावरील जुने दालन व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांचे तिसऱ्या मजल्यावरील दालने कायम ठेवण्यात आली आहेत. गिरीष महाजन, मंगलप्रभात लोढा यांची दालने ‘जैसे थे’ आहेत. शिवसेना शिदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (सातवा मजला) गुलाबराव पाटील (चौथा मजला) अशी दालने आहेत. सहा राज्यमंत्र्यापैकी मेघना बोर्डीकर, इंद्रनिल नाईक, योगेश कदम यांना विधानमंडळात पहिल्या मजल्यावर दालने देण्यात आली आहेत.

    The displeasure of the ministers as there are no Dalan as pet Vaastu Shastra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार