• Download App
    विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन|The death of the farmer who set himself on fire in front of the legislature was due to a dispute over land grabbing

    विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एका शेतकऱ्याने विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या शेतकऱ्याचा सोमवारी जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.The death of the farmer who set himself on fire in front of the legislature was due to a dispute over land grabbing

    सुभाष देशमुख (५६) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. देशमुख हे ४५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते.



    सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी होत. त्यांनी २३ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या हातून पेट्रोलची बाटली काढून घेतली होती. दरम्यान, त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

    The death of the farmer who set himself on fire in front of the legislature was due to a dispute over land grabbing

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस