विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: सध्याचे राजकीय वातावरण म्हणजे मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असंच सुरु आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.आंबेडकर म्हणाले की, मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असे राजकारण चालले आहे का?The current political climate is the beard of Muslims and Shendi of Hindus, criticism of Prakash Ambedkar
तू माझी दाढी पकड आणि मी तुझी शेंडी असंच सुरु असल्याचं सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे जनतेला सुद्धा असंच राजकारण पाहिजे आहे. त्यामुळे दोष कुणाला देणार, निवडून आलेल्यांना की निवडून देणाऱ्याला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले,
माझं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आहे की, नुरा कुस्तीतील पैलवान होण्यापेक्षा त्यांनी मैदानातील पैलवान व्हायला पाहिजे. फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना पेनड्राईव्ह दिला आहे. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे त्यांनी तो पेनड्राइव्ह जनतेला द्यावा, त्यानंतर त्यांना लोकं आखाड्यातील पैलवान मानतील. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना ठरवायचं आहे की, ते नुरा कुस्तीतील पहिलवान आहे की आखाड्यातील पैलवान?
The current political climate is the beard of Muslims and Shendi of Hindus, criticism of Prakash Ambedkar
महत्त्वाच्या बातम्या
- दारुण पराभवामुळे जयंत चौधरी भांबावले, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर सर्व संघटना केल्या बरखास्त
- रावसाहेब दानवे यांची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजाराचे बक्षीस, नाभिक समाजाने का केली ही घोषणा?
- जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांचे पुतीन यांना आव्हान, एकट्याने लढण्यास तयार आहात का?
- The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ उत्तर प्रदेशातही करमुक्त ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा