• Download App
    उद्या माळेगावच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ; संपूर्ण तालुक्याचे अजित पवारांच्या सभेकडे लक्षThe crushing season of Malegaon sugar factory starts tomorrow; The whole taluka pays attention to Ajit Pawar's meeting

    उद्या माळेगावच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ; संपूर्ण तालुक्याचे अजित पवारांच्या सभेकडे लक्ष

    आता माळेगावच्या या सभेत अजित पवार नेमक काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.The crushing season of Malegaon sugar factory starts tomorrow; The whole taluka pays attention to Ajit Pawar’s meeting


    विशेष प्रतिनिधी

    माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा हंगाम शुभारंभ आणि इटीपी प्लॅन्टचे उद्‌घाटन समारंभ शुक्रवार ( उद्या ,दि.१५ ) सकाळी ८:३०वाजता होणार आहे.यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण बारामती तालुक्‍याचे या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे.

    आत्ताच झालेल्या सोमेश्‍वर कारखान्याच्या सभेत अजित पवार म्हणाले होते की , आता माळेगाव कारखान्याचे यानंतर होणारे अध्यक्ष तावरे आडनाव सोडून दुसरे आडनाव असेल.



    त्यानंतर संपूर्ण बारामती तालुक्‍यात या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू होती. त्यामुळे आता माळेगावच्या या सभेत अजित पवार नेमक काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

    सोमेश्‍वर कारखान्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा शिवतीर्थ मंगल कार्यालय शिवनगर येथे सभा होणार आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

    The crushing season of Malegaon sugar factory starts tomorrow; The whole taluka pays attention to Ajit Pawar’s meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार