• Download App
    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे निकष बदलले, योजनेचा विस्तार; वाचा तपशीलवार!!The criteria for Chief Minister's beloved sister scheme has changed

    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे निकष बदलले, योजनेचा विस्तार; वाचा तपशीलवार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर आज या योजनेचा फॉर्म मिळवण्यासाठी राज्यातील विविध केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. त्यामध्ये या योजनेचा कसा विस्तार केला ते देखील सांगितले.

    मुख्यमंत्री म्हणाले :

    •  या योजनेसाठी जीआर काढण्यात आला आहे. योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18000 रुपये सरकार देणार आहे. 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरु झाली आहे. 46000 हजार कोटी रुपये माता-भगिनींना देणार आहोत. पात्र प्रत्येक महिलेची नोंदणी होईल ती नोंदणी ज्या महिन्यात होईल, त्याचवेळी जुलै महिन्यापासूनचे सगळे पैसे एकदम त्या बहिणीच्या खात्यात जमा होतील.
    •  वास्तविक मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला काही द्यायच म्हटलं की, विरोधकांच्या पोटात दुखतं.
    •  जे चांगलं आहे, ते चांगलं म्हटलं पाहिजे, जिथे चुकत असेल तिथे सूचना करा. विरोधी पक्षाने चांगलं म्हटलं असं ऐकिवात नाही. कौतुक करता येत नसेल, तर बिनबुडाची टीका टाळली पाहिजे.
    •  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हा मी, दोन्ही उपमुख्यमंत्री महायुती सरकारच्या भावंडांकडून बहिणींना दिलेला माहेरचा आहेर आहे. हा आहेर नियमित देत राहणार. काळजी करु नका. आपल्याकडे जो जुना डेटाबेस आहे, त्यातून माहिती घेऊन 2.50 लाख बीपीएल धारकांसाठी तात्काळ योजना सुरु होईल. वयाचा निकष बदलून 60 ऐवजी 65 केला आहे. योजनेचा हा विस्तार आहे.
    •  कुणीही सरकारी कर्मचारी बहिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निलंबित करुन जेलमध्ये टाकू. माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही. जो मागत असेल, त्याची तक्रार करा. जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही.
    •  लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार??

    The criteria for Chief Minister’s beloved sister scheme has changed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल