विशेष प्रतिनिधी
सांगली : शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात राज्य आणि केंद्र सरकार विषयी आपली नाराजी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली होती. राज्यातील 30 ते 35 साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं तर सहकार मंत्र्यांना नेमकी काय अडचण आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला होता.
The country is on the path to privatization. Therefore, let’s forget our differences and increase the power of the people by uniting all the movements in the country: Raju Shetty
पुढे ते म्हणतात, कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असतानाही, जर तो डावलला जात असेल तर तसे करणारे साखर का सुरू होऊ द्यावेत? ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्यास ऊस गळती हंगाम जोमात असतानाही तो बंद पाडू. असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.
यशवंतराव चव्हाण, पी डी पाटील यांचा वारसा सांगताना ते म्हणाले, बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. पण शेतकर्यांना कायद्याने त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळवून देण्याऐवजी शेतकर्यांचे रक्षण न करता भक्षकांसारखे का वागत आहेत? असे बोलून त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका करताना पुढे राजू शेट्टी म्हणाले, ते सहकारमंत्री आहेत की सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत? हे समजून येत नसल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.
राजू शेट्टींचा किरीट सोमय्या आणि अजित पवार यांच्यावर निशाणा
देशात आता जवळपास सर्व चळवळी संपल्यामध्ये जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ तग धरून उभी आहे. पण ही देखील चळवळ संपविण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे. एअर इंडिया विकली गेली. बीएसएनएलचा आता नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. ही मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळीमध्ये असते. त्यामुळे आपापसातले मतभेद विसरून देशातील सर्व चळवळीं एकत्र करून जनतेची शक्ती वाढवु. असेदेखील ते यावेळी म्हणाले आहेत.
The country is on the path to privatization. Therefore, let’s forget our differences and increase the power of the people by uniting all the movements in the country: Raju Shetty
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेनेने प्रथमच व्यक्त केले मत
- साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे ; शिवेंद्रराजे यांचा घणाघात , DCC बँक आणि पालिकेवरून वाढला वाद
- अनंत गीते बंडाच्या पवित्र्यात? गीते समर्थकांचे राजीनामे
- गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयची नौदल अधिकाऱ्याला अटक, नौदलाचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश