• Download App
    एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदींचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन The concept of Ek Bharat Shrestha Bharat reflects the thinking of Chhatrapati Shivaji Maharaj

    एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदींचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संपूर्ण देशाने आज अंगीकृत केलेली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये स्वराज्याची ललकार आणि राष्ट्रीय एकाच वेळी समाहित होती. त्याच मार्गाने देशाची वाटचाल सुरू आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. The concept of Ek Bharat Shrestha Bharat reflects the thinking of Chhatrapati Shivaji Maharaj

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर सुरू असलेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे मोदींचा संदेश प्रसारित करण्यात आला. या संदेशात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य सूत्राचे रहस्य उलगडून दाखवले.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की आज संपूर्ण देशाने अंगीकृत केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य राज्याभिषेक सोहळ्यात स्वराज्याची ललकार आणि राष्ट्रहित समाहित होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा हा दिवस आपल्यासाठी एक नवी ऊर्जा घेऊन आला आहे. छत्रपतींचा कालखंड देशाच्या इतिहासातला एक अद्भुत आणि विशिष्ट कालखंड आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या अंधारातून छत्रपतींनी आपल्या कर्तृत्वाने देशाला स्वराज्याच्या प्रकाश किरणांकडे नेले.

    त्यांचा राज्याभिषेक सोहळा हा स्वराज्याच्या प्रकाश किरणांकडे नेणारा उत्सव आहे. राष्ट्र कल्याण आणि लोक कल्याण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाची मूलतत्त्वे होती आणि त्या सूत्राच्या आधारेच आज देशाची वाटचाल सुरू आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

    The concept of Ek Bharat Shrestha Bharat reflects the thinking of Chhatrapati Shivaji Maharaj

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक