विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडून मारहाण झाल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांनी केली होती. पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सहीसह एक तक्रार अर्जही केला. पण हा अर्ज व्हायरल झाल्यावर याबाबत आपण कुठलीही तक्रार केली नसल्याचेही म्हटले आहे. मात्र, त्यामुळे या प्रकरणातील गौडबंगाल काय आहे याची चर्चा सुरू आहे.The clerk complained that MLA Nilesh Lanka had beaten him and took it back!
आमदार निलेश लंके यांनी मला कोणत्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही तक्रार अर्ज केला नाही. आमदार साहेबांकडून मला मारहाण झाल्याची पोस्ट फिरत आहे. समाजमाध्यमातून आपली बदनामी होत असल्याचेही राहूल पाटील यांनी म्हटले आहे.
बुधवार, चार ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रुग्णालय अधीक्षक डॉ. सौ. उंद्रे यांनी फोन करुन मला रुग्णालयात बोलावले होते. त्यावेळी तिथे कोविड लसीकरण टोकन वाटपावरुन गोंधळ सुरु होता. गोंधळाबाबत कोणत्यातरी तक्रारीवरुन शाहनिशा करण्यासाठी आमदार निलेश लंके तिथे आले होते.
त्यांनी रुग्णालय अधीक्षकांना गोंधळाबाबत जाब विचारला. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत आमदार लंके, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष पंचनामा केला. झालेल्या प्रकराबाबत उंद्रे यांनी माफी मागितली. त्यानंतर आमदार तिथून निघून गेले. पाच ऑगस्टला तालुक्यातील काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालय येथे आले होते. त्यांनी काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालय येथे आले होते.
त्यांनी काही पत्रकारांना माझा फोन नंबर देऊन आमदार लंके यांनी मारहाण केल्याचं आणि शिवीगाळ केल्याचं बोल असं मला सांगण्यात आलं. दबावापोटी मी घाबरलो आणि त्यांनी सांगिल्याप्रमाणे स्टेटमेंट दिले. प्रत्यक्षात तसं काहीही घडलेले नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
लसीकरणाबाबत टोकन वाटपावेळी आमदार निलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांच्यावर टोकन वाटपात पैसे घेतल्याचा आरोप केला. या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता आमदार लंके यांनी त्यांना मारहाण केली.
अन्य दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी आणि पारनेर पोलीस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडल्याचेही बोलले जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे पत्राद्वारे केली आहे, असा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.
The clerk complained that MLA Nilesh Lanka had beaten him and took it back!
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन
- आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने
- कलम 370 पासून मुक्तीची दोन वर्षे : फुटीरतावादाची निघाली हवा, देशद्रोह्यांचा आवळला फास, दगडफेक करणारेही झाले गायब
- यूकेने भारताला रेड लिस्टमधून काढले, 10 दिवसांचे हॉटेल क्वारंटाइन बंद, आता फक्त होम आयसोलेशन