विशेष प्रतिनिधी
पुणे : चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही मकर संक्रांतीपासून शहरामध्ये पतंग उडवण्यासाठी याचा वापर केला जातो. आजही बंदी असूनही रविवार पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ या शहरातील पेठांमध्ये खूप दुकानात हा मांजा सर्रास विकला जातो. पुण्यात सर्वत्र तो वापरला जातो. The Chinese ‘Manja’ got up on the birds More than 35 birds injured during the month
हा मांजा घातक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. २०१५ मध्ये एका जनहित याचिकेनंतर कोर्टाने या मांजावर बंदी घातली. त्यानंतर २०१७ मध्ये इकोफ्रेंडली मांजा बाजारात आला, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. २०१८ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपन असलेल्या नायलॉन, तंगूस उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली, मात्र या मांजाची विक्री काही थांबली नाही.
या पतंगबाजीचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसतो. निष्पाप पक्ष्यांचा जीव जातो किंवा त्यांना आयुष्यात पुन्हा कधी आकाशात भरारी घेता येत नाही आणि पूर्ण आयुष्य अपंगत्वात घालवावे लागते.या महिन्याभरात ३५ पेक्षा अधिक पक्षी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजीव गांधी प्राणी संग्रहलयात उपचार करण्यात आले.
तसेच, काही पक्षीप्रेमिंनी कात्रजला जाणे शक्य नाही म्हणून आपल्या परिसरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचार घेतले. जखमी पक्ष्यांमध्ये गव्हाणी घुबड, कावळे, कोकीळा, पारवे, घार, पोपट आदींचा समावेश होता.
वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसूळ व त्यांचे सहकारी रवी जगधणे, कीर्तिराज आगलावे यांनी आज अग्निशमन दल आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीने दिवस भरात एक कावळा दोन घार आणि एक पारवा वाचवला.
The Chinese ‘Manja’ got up on the birds More than 35 birds injured during the month
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election : भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट
- भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल ;शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक आणि शरद दोषी, सर्वांना सहा वर्षांची शिक्षा
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या, बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह
- TET Exam Scam : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा, 7 हजार 800 नापास विद्यार्थी पैसे देऊन झाले उत्तीर्ण